Winter friendly flours or atta you must try to keep body warm and energetic | हिवाळ्यात 'या' ५ पीठांपासून बनवलेली भाकरी खाल; तर आरोग्याच्या तक्रारींसाठी दवाखान्यात जाणं विसराल

हिवाळ्यात 'या' ५ पीठांपासून बनवलेली भाकरी खाल; तर आरोग्याच्या तक्रारींसाठी दवाखान्यात जाणं विसराल

हिवाळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या व्हायरल आणि बॅक्टेरिअल संक्रमणाचा सामना करावा लागतो. बदलत्या वातावरणामुळे उद्भवत असलेल्या आजारांपासून  बचाव करण्यासाठी आपली रोगप्रतिकारकशक्ती चांगली असणं गरजेच असतं.कारण व्हायरल संक्रमण असो किंवा साधा ताप संक्रमणापासून लढण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती महत्वाची असते. प्रत्येक ऋतूत आपण गव्हाच्या पीठाचा मोठ्या प्रमाणावर आहारात समावेश करतो.  याशिवाय इतर पोषक तत्व असेलल्या पीठांचाही तुम्ही आहारात समावेश करू शकता. या पीठांपासून बनवलेल्या चपात्या केवळ स्वादिष्ट नसून ते तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवतात. आज आम्ही तुम्हाला  ५ प्रकारच्या पीठांबद्दल सांगणार आहोत. 

बाजरीची भाकरी

बाजरीच्या भाकरीचा आहारात समावेश केल्यास रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते. बाजरीच्या पीठात फायबर आणि पोटॉशियम  मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे बाजरीच्या भाकरीच्या सेवनाने भूक जास्त लागत नाही. बाजारीत मॅग्नेशियमसारखा महत्वाचा घटक असल्यानं रक्तदाब नियंत्रणात राहतो. बाजरीच्या भाकरीत गव्हाच्या चपातीपेक्षा कमी कॅलरी असतात. त्यामुळे वजन वाढत नाही. बाजरी उष्ण असते. त्यामुळे थंडीत शरीरात ऊर्जा निर्माण करते. बाजरीमुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी राहते.

ज्वारीची भाकरी

ज्वारीची सर्वात खास बाब ही आहे की, ज्वारी ग्लूटेन फ्री असते, लठ्ठपणा किंवा वजन वाढणं ही एक मोठी समस्या झाली आहे. तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ज्वारीची मदत होऊ शकते. ज्वारीने वजन कमी होतं आणि ब्लड सर्कुलेशनही व्यवस्थित होण्यास मदत मिळते. कारण ज्वारीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. फायबर वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतं. त्यामुळे ज्वारी अधूनमधून का होईना तुम्ही खाऊ शकता.

मक्याची भाकरी

मक्याच्या पीठामध्ये व्हिटॅमिन ए आणि कॅरोटिनॉइड मुबलक प्रमाणात असतं, त्यामुळे याचं सेवन डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतं. मक्याचे सेवन केल्याने डोळ्यांचं आरोग्य राखण्यास मदत होते. मक्याच्या पीठामध्ये आयर्न असतं त्यामुळे याचं सेवन केल्याने एनीमियाच्या समस्येपासून सुटका होते. मक्याच्या पीठाचं सेवन केल्याने रक्ताची कमतरता होत नाही आणि शरीरामध्ये हिमोग्लोबिनचा स्तरही योग्य राहत नाही. मक्याच्या पीठाचं सेवन केल्याने शरीरामध्ये मुबलक प्रमाणात फायबर पोहोचत नाही. ज्यामुळे शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचा स्तरही सामान्य राहतो. त्यामुळे बद्धकोष्टाची समस्या दूर राहते. मक्याच्या पीठाचं सेवन केल्यामुळे शरीरामध्ये ऊर्जा मिळते. तसेच सतत भूक लागत नाही, ज्यामुळे तुम्ही ओव्हरइटिंग करण्यापासून वाचता. यामुळे वजन वाढण्याची समस्या होत नाही.

नाचणीची भाकरी

 नाचणी हा एक अतिशय स्वस्त कार्बोहाइड्रेट व प्रोटीन स्रोत आहे. मात्र पौष्टीकतेच्या दृष्टीने फारच लाभदायी आहे. नाचणी हे अनेक फायदे होतात. नाचणी पचायला हलकी असते. त्यातील पॉलीफ़ेनोल्सनी रक्तातील शर्करेची मात्रा व्यवस्थित रहाते. ट्राइग्लिसरायड कमी करते तसेच LDL कलेस्टरॉल कमी करते.  रोजच्या आहारात पेज, भाकरी, नाचणीचे थालीपिठ अशा अनेक प्रकारे नाचणी सेवन करता येईल.  लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच नाचणीचे सेवन वेगवेगळ्या पदार्थांच्या माध्यमातून करू शकतात. 

राजगिरा

शरीराच्या अनेक अवयवांना ताकद देणारा राजगिरा म्हणजे, कॅल्शिअम आणि आयर्नचा उत्तम स्त्रोत आहे. याव्यतिरिक्त राजगिऱ्यामध्ये मॅग्नेशिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम यांसारखी आवश्यक तत्वही असतात. राजगिऱ्याच्या लाह्या पचण्यास अत्यंत हलक्या आणि शरीरासाठी पौष्टिक असतात. राजगिऱ्यापासून धिरडी, थालिपीठं, डोसे, उपमा असे पदार्थही तयार करण्यात येतात. 

राजगिऱ्यामध्ये इतर धान्यांच्या तुलनेत तीन पटिंनी अधिक कॅल्शिअम असतं. त्यामुळे याचा डाएटमध्ये समावेश केल्याने हाडं मजबुत होण्यास मदत होते. तसेच ऑस्टियोपोरोसिस यांसारख्या समस्या बळावण्याचा धोका कमी होतो. नियमितपणे राजगिऱ्याचा आहारात सामवेश केल्याने केसांच्या समस्या दूर होतात. यामध्ये मुबलक प्रमाणात लायसिन असतं, जे केस दाट आणि मजबुत करण्यासाठी मदत करतं. तसेच यामध्ये सिस्टीनही असतं, जे केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतं. याशिवाय राजगिऱ्याच्या बियांमध्ये फायटोस्टरोल असतं, जे कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यासाठी मदत करतं. तसेच हे शरीरामधील शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवतं आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करतं. 

(टिप : वरील सर्व गोष्टी या केवळ माहीती म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. )

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Winter friendly flours or atta you must try to keep body warm and energetic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.