१ मार्चपासून लस मिळवण्यासाठी ४५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्यांना फक्त 'हे' काम करावं लागणार

By manali.bagul | Published: February 25, 2021 02:03 PM2021-02-25T14:03:58+5:302021-02-25T14:04:51+5:30

CoronaVirus News & Latest Updates : आजाराने ग्रस्त 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना यासाठी स्वाक्षरीकृत वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असेल.

Know who will get vaccine from 1st-march 2021 and how to get coronavirus vaccine if you are 45 and above | १ मार्चपासून लस मिळवण्यासाठी ४५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्यांना फक्त 'हे' काम करावं लागणार

१ मार्चपासून लस मिळवण्यासाठी ४५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्यांना फक्त 'हे' काम करावं लागणार

Next

सरकारनं बुधवारी घेतलेल्या निर्णयानुसार ६० वयापेक्षा जास्त वय असलेल्यांना आणि कोणत्याही आजारानंग्रस्त असलेल्या 45 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांना 1 मार्चपासून कोरोना लस (Coronavirus Vaccine) मोफत दिली जाणार आहे. मात्र खासगी केंद्रावर लसीकरणासाठी गेल्यास शुल्क भरावे लागणार आहे. याशिवाय गंभीर आजाराने ग्रस्त 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना यासाठी स्वाक्षरीकृत वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असेल.
पुढील काही दिवसात एक यादी तयार करण्यात येणार आहे. त्यात  गंभीर आजार असलेल्या व्यक्तीचा समावेश केला जाणार आहे.

साधारपणपणे या आजारांमध्ये कॅन्सर, दमा, मानसिक आजार, त्याचप्रमाणे लोकांव्यतिरिक्त तीव्र हृदय रोग, फुफ्फुस, मूत्रपिंड आणि यकृताचा आजार असलेल्या लोकांचाही समावेश असू शकतो.  लसीकरणासाच्या कोव्हिन अॅपचा वापर केला जाईल आणि त्याअंतर्गतच त्यांना जवळच्या लसीकरण केंद्राची माहिती दिली जाईल. 

सध्या हे अॅप्लिकेशन केवळ आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कामगारच वापरू शकत आहेत.
येत्या दोन दिवसांत एक यादी जाहीर करण्यात येणार असून त्यात कोणत्या आजारांना गंभीर प्रकारात समाविष्ट केले जाईल याची माहिती देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पाठ आणि कंबरदुखीचे कारण ठरू शकतात रोजच्या चुकीच्या सवयी; पाठीच्या कण्याचं होतय नुकसान

यात मधुमेह, कर्करोग, गंभीर दमा आणि मानसिक आजार त्याचप्रमाणे शिकण्यास असक्षम असलेल्या लोकांव्यतिरिक्त तीव्र हृदय रोग, फुफ्फुस, मूत्रपिंड आणि यकृत यांचा आजार असणाऱ्यांचा समावेश असू शकतो. यामध्ये इम्युनोसप्रेसन्ट्स, स्थूलपणा असलेले रूग्ण आणि अस्थिमज्जा किंवा स्टेम सेल ट्रान्सप्लांट केलेल्या रुग्णांचा देखील समावेश असू शकतो. पाठ आणि कंबरदुखीचे कारण ठरू शकतात रोजच्या चुकीच्या सवयी; पाठीच्या कण्याचं होतय नुकसान

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारी व्हॅक्सिनेशन सेंटर्सवर ही लस मोफत दिली जाणार आहे. लसीकरणाआधी फॉर्म आणावा लागणार आहे. लस घेताना त्यांना हा फॉर्म आणावा लागणार नाही. दरम्यान खाजगी लसीकरण केंद्रावर कोव्हिड व्हॅक्सिनच्या एका डोसची किंमत ३०० रुपयांपर्यंत असू शकते. 

Web Title: Know who will get vaccine from 1st-march 2021 and how to get coronavirus vaccine if you are 45 and above

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.