Know what is long Covid do not ignore the signs and symptoms | Long Covid: कोरोना निगेटिव्ह आल्यावरही अनेक महिने राहतात लॉंग कोविडची लक्षणे, दुर्लक्ष नकोच!

Long Covid: कोरोना निगेटिव्ह आल्यावरही अनेक महिने राहतात लॉंग कोविडची लक्षणे, दुर्लक्ष नकोच!

(Image Credit : pharmaceutical-journal.com)

कोरोनाने संक्रमित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. त्यासोबतच दररोज कोरोना व्हायरससंबंधी (Coronavirus) नवीन गोष्टी समोर येत आहेत. अनेक रिसर्चनुसार, हलकी लक्षणे (Mild Symptoms) असलेले कोविड-१९ चे साधारण ५० टक्के रूग्ण असे आहेत ज्यांच्यात संक्रमण ठीक झाल्यावरही म्हणजे त्याचे रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आल्यावरही त्यांची तब्येत पूर्णपणे बरी होत नाही. अशा रूग्णांना साधारण ६ महिन्यांपर्यंत कोरोनाशी संबंधित काहीना काही समस्या होते. यालाच लॉंग कोविड किंवा पोस्ट कोविड सिंड्रोम नाव (Long Covid or Post Covid Syndrome)  देण्यात आलं आहे.

काय आहे ही समस्या?

अनेक रिसर्चमधून हा सल्ला देण्यात आला आहे की, कोविड - १९ ची हलकी लक्षणे असलेले रूग्ण सामान्यपणे संक्रमित झाल्यावर १ ते २ आठवड्यात बरे होतात. तेच गंभीर लक्षणे असलेल्या रूग्णांना बरं होण्यासाठी ६ ते ७ आठवडे लागतात. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, कोविड-१९ मधून रिकव्हर झाल्यानंतर म्हणजे रूग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही जर त्यांना हलका खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा, श्वास घेण्यास त्रास, गंध न येणे, चव जाणे अशा समस्या दिसल्या तर याला लॉंग कोविड म्हटलं जातं. (हे पण वाचा : CoronaVirus : कोरोना काळात श्वास घ्यायला त्रास झाल्यास हा घरगुती उपाय करणं ठरू शकतं जीवघेणं, वेळीच सावध व्हा)

कुणाला जास्त धोका

ब्रिटनच्या ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिसटिक्सने एक सर्वे केला होता. ज्यात २० हजार लोकांनी सहभाग घेतला होता. या सर्व्हेतून समोर आले होते की, कोविड-१९ ने संक्रमित झाल्यावर प्रत्येक ५ पैकी १ व्यक्तीमध्ये ठीक झाल्यावरही ५ ते १२ आठवडे ही लक्षणे दिसू शकता. लॉंग कोविडची ही समस्या पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक बघायला मिळते.

या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

सतत खोकला येणे - कोविड-१९ मुळे जर रूग्णांला खोकला झाला असेल तर श्वसन मार्गात यामुळे इन्फ्लेमेशन होऊ शकतं. ज्यामुळे इन्फेक्शन ठीक झाल्यावरही अनेक आठवडे किंवा महिन्यांपर्यंत खोकला राहू शकतो. (हे पण वाचा : CoronaVirus : शरीरातील ऑक्सीजन स्तर कमी होऊ लागला, तर करा 'हा' उपाय; आरोग्य मंत्रालयानं दिलीय माहिती)

डायरिया - रिसर्चनुसार कोविड-१९ मुळे तुमच्या पचन तंत्रावर फार वाईट परिणाम होतो. ज्यामुळे तुम्हाला बऱेच दिवस डायरियाची समस्या होऊ शकते.

भूक न लागणे - आजारातून बरे झाल्यानंतरही अनेक रूग्णांना कशाची चव लागत नाही. त्यामुळे त्यांना योग्यपणे भूकही लागत नाही. तसेच काही खाण्याचंही मन करत नाही. ही समस्या काही आठवडे अशीच राहू शकते.

कमजोरी - अनेक रिसर्चमध्ये हे सांगण्यात आले आहे की, लॉंग कोविडने ग्रस्त साधारण ८० टक्के रूग्ण थकवा आणि कमजोरीने त्रासले आहेत. त्यांना ही समस्या निगेटिव्ह आल्यावरही अनेक दिवस जाणवू शकते.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Know what is long Covid do not ignore the signs and symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.