सुका खोकला आणि ओला खोकला यातील फरक आणि सोपे घरगुती उपाय, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 06:30 PM2020-08-24T18:30:03+5:302020-08-24T18:37:13+5:30

अशा स्थितीचा सामना करावा लागत असेल तर घाबरायचं काहीही कारण नाही. आज आम्ही तुम्हाला सुका खोकला आणि ओला खोकला यातील फरक आणि त्यावरचे उपाय सांगणार आहोत.

know what is difference between dry cough and wet cough | सुका खोकला आणि ओला खोकला यातील फरक आणि सोपे घरगुती उपाय, जाणून घ्या

सुका खोकला आणि ओला खोकला यातील फरक आणि सोपे घरगुती उपाय, जाणून घ्या

googlenewsNext

पावसाळ्यात तसंच वातावरणातील बदलांमुळे अनेकदा सर्दी, खोकला तापाची समस्या उद्भवते. कोरोना काळात आजारी पडायला लोक घाबरत आहेत. इतर कारणांमुळे आजारपण आलं तरी कोरोनाची संसर्ग झाला असावा अशी भीती निर्माण होते. तुम्हालाही अशा स्थितीचा सामना करावा लागत असेल तर घाबरायचं काहीही कारण नाही. आज आम्ही तुम्हाला सुका खोकला आणि ओला खोकला यातील फरक आणि त्यावरचे उपाय सांगणार आहोत.

सुका खोकला आल्यामुळे श्वसनतंत्रावर सूज येणं किंवा जळजळ होण्याची स्थिती उद्भवते. साधारणपणे गळा, फुफ्फुसांना सुज येते. व्हायरल इन्फेक्शन शारीरिक ताण तणाव यांमुळे ही स्थिती उद्भवते.ओल्या खोकल्याच्या तुलनेत सुका खोकला हा दीर्घकाळ राहतो. सर्दी, फ्लू झाल्यानंतर अनेक आठवड्यांपर्यंत सुका खोकला तसाच राहत असल्यामुळे नियंत्रणात आणणं कठीण होतं. सुका खोकला कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचे प्राथमिक लक्षण आहे. एलर्जी, सायनसइटीस, अस्थमा, टॉन्सिलाइटिस. धुळ किंवा धूरामुळेही सुक्या खोकल्याचा त्रास होतो. 

सुका खोकला आल्यास कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा धोका जास्त असतो. यासोबत ताप, वास न येणं, श्वास घ्यायला त्रास होणं, उलट्या गॅस्ट्रोइंटेस्टाईन समस्या असतील त्वरित तपासणी करून घ्या. ओला खोकला छातीत जास्त कफ जमा झाल्यानं किंवा जास्त थंड, तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे येते. गरम पाण्याचे सेवन नियमित करून खोकला नियंत्रणात आणता येऊ शकतो. 

Health Tips : Get rid of waterborne diseases in rainy season | पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे पसरताहेत जीवघेणे आजार; संसर्ग होण्याआधी स्वतःला

उपाय

तुळशीची पानं, आलं आणि जेष्ठमध बारिक करून त्यामध्ये मध एकत्र करून खा. त्यामुळे ताप, डोकेदुखी, घशात होणारी खवखव, सर्दी, खोकला यांसारख्या समस्या दूर होतात. तुळशीच्या पानांच्या अर्कात मध एकत्र करून प्यायल्याने किडनी स्टोनची समस्या दूर होते. त्याचबरोबर क्रॉनिक ब्रॉन्कायटिस, अस्थमा यांसारख्या श्वासाशी निगडीत आजारांवरही फायदेशीर ठरतो. 

खोकल्याचा त्रास होत असल्यास काळी मिरी आणि खडीसाखर योग्य प्रमाणात वाटून घ्या. त्यामध्ये तूप घालून त्याच्या लहान गोळ्या बनवा. दिवसातून ३ ते ४ वेळा गोळी चोखल्यास, तुमचा कफ असलेला खोकला निघून जाण्यास मदत होईल.

कफ झाला की सतत कोरडा खोकला लागतो. अशावेळी बडिशेप पाण्यात उकळून ते पाणी दिवसभरातून थोडे थोडे घेत रहावे. त्याने कफ पातळ होऊन निघून जातो.

कोरडा खोकला झाला की त्यातून रक्त पडते. अशावेळी अडुळशाच्या पानांचा रस आणि खडीसाखर एकत्र करुन घेतल्याने समस्या कमी होते. 

रात्री झोपण्यापूर्वी ७ ते ८ बदाम पाण्यात भिजत घालावेत. सकाळी बदाम भिजल्यानंतर त्याची पेस्ट करुन त्यात लोणी आणि मध घालून घेतल्याने आराम मिळतो.

हे पण वाचा-

चिंताजनक! कोरोना लसीसाठी 'असा' शॉर्टकट वापरल्यास संपूर्ण जगाचा जीव धोक्यात येणार

Coronavirus: कोरोना लस ७३ दिवसांत आणि मोफत शक्य नाही; सिरम इन्स्टिट्यूटचं स्पष्टीकरण

Coronavirus: कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींच्या रक्तात गुठळ्या होण्याचे प्रकार - डॉ. संजय ओक

Web Title: know what is difference between dry cough and wet cough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.