मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 

हा सामना पाहण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ( Janhvi Kapoor ) स्टेडियमवर उपस्थित होती आणि मिचेल स्टार्कने सोपा झेल सोडल्यावर तिची रिअॅक्शन पाहण्यासारखी होती.  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 09:31 PM2024-05-26T21:31:57+5:302024-05-26T21:32:24+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, KKR vs SRH Final Marathi Live : Janhvi Kapoor reaction when Mitchell Starc dropped an easy catch of Pat Cummins, Video  | मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 

मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, KKR vs SRH Final Marathi Live : सनरायझर्स हैदराबादनेआयपीएल २०२४ फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्ससमोर पूर्णपणे लोटांगण घातले. कर्णधार पॅट कमिन्स ( २४) हा SRH साठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. मिचेल स्टार्क ( २-१४), हर्षित राणा ( २-२४) व आंद्रे रसेल ( ३-१९) यांच्या माऱ्यासमोर SRH चा पूर्ण संघ १८.३ षटकांत ११३ धावांत तंबूत परतला. हा सामना पाहण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ( Janhvi Kapoor ) स्टेडियमवर उपस्थित होती आणि मिचेल स्टार्कने सोपा झेल सोडल्यावर तिची रिॲक्शन पाहण्यासारखी होती.  


मिचेल स्टार्कने भेदक मारा करून KKR ला अपेक्षित सुरुवात करून दिली. वैभव अरोरा व हर्षित राणा यांनी त्याला सुरुवातीच्या षटकांत चांगली साथ दिली. त्यानंतर आंद्रे रसेलने २.३ षटकांत १९ धावा देताना ३ विकेट्स घेऊन हैदराबादचा डाव गुंडाळला. नवव्या क्रमांकावर आलेला कमिन्स व जयदेव उनाडकट ( ४) यांची २३ धावांची भागीदारी सुनील नरीनने तोडली. या सामन्यातील ही दुसरी सर्वोत्तम ( २६ धावा, नितीश रेड्डी व एडन मार्करम) भागीदारी ठरली.  रसेलने डावातील तिसरी विकेट घेताना पॅट कमिन्सला २४ धावांवर माघारी पाठवले. हैदराबादचा संपूर्ण संघ १८.३ षटकांत ११३ धावांत तंबूत परतला. 




 

Web Title: IPL 2024, KKR vs SRH Final Marathi Live : Janhvi Kapoor reaction when Mitchell Starc dropped an easy catch of Pat Cummins, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.