सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकालाच स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळ मिळत नाही. नकळतपणे उद्भवणाऱ्या समस्याचं रूपांतर गंभीर आजारांमध्ये होतं. आहार घेण्याच्या सवयी चुकीच्या असणं किंवा खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करणं ही कारणं  आजारपण उद्भवण्याची असू शकतात. बराच वेळ ऑफिसमध्ये काम करत असताना पाणी पिण्याकडे दुर्लक्ष होतं. तसंच चहा कॉफी जास्त प्रमाणात घेतली जाते. त्याचप्रमाणे ऑफिसमध्ये काम करत असताना चुकीच्या स्थीतीत बसल्याने वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. या सवयींचा नकारात्मक परिणाम तुमच्या किडनीवर सुध्दा होऊ शकतो. 

(Image credit- ask darsha.com)

किडनीमध्ये मुतखडा होण्याची समस्या उद्भवल्यास खूप त्रासदायक असतात. मुतखडा झाल्यानंतर पोटाच्या खालच्या भागात वेदना होतात. किडनी स्टोममध्ये कॅल्शियम आणि युरीक अ‍ॅसिडपासून तयार झालेला खडा मुत्राशयाला बाधा निर्माण करतो. जाणून घ्या काय आहेत किडनी स्टोनची लक्षणं.


 (Image credit- practicalpain management)

कंबर दुखणे

लघवी करताना खूप त्रास होणे

लघवी चा रंग पिवळा होणे

लघवीला तीव्र घाणेरडा वास येणे. 

ताप व उलटी होणे

लघवीला साफ न होणे

बसायला आणि उठण्यास त्रास होणे.

(Image credit-keckmedicalofusc)

किडनी स्टोन होण्याची दोन सगळ्यात मोठी कारणं आहेत ती म्हणजे लठ्ठपणा आणि डिहायड्रेशन. जेव्हा शरीर काही कारणामुळे कोरडं पडतं असतं म्हणजेच डिहायड्रेट होतं. त्यावेळी किडनी स्टोन होण्याचा धोका जास्त असतो.

(image credit- njurulogy.com)

किडनी स्टोन झाल्यास  खडा जास्त मोठा असल्यास ऑपरेशन करून काढावा लागतो. किडनी स्टोन झाल्यानंतर सगळ्यात जास्त पोटात आणि शरीराच्या हाडांमध्ये वेदना होतात. किडनी स्टोनच्या समस्येची तीव्रता कमी असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेऊन सुध्दा समस्या सुटेल. 

 

Web Title: Know the symptoms of kidney stone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.