(Image Credit : wonderopolis.org)
काही लोक जसेही पायातून शूज काढतात त्यांच्या आजूबाजूला बसलेले लोक तिथून कलटी मारतात किंवा त्यांच्याकडे वाकड्या नजरेने बघतात. याचं कारण असंत पायांची दुर्गंधी येणे. ज्या लोकांना ही समस्या होते त्यांना अनेकदा चारचौघात लाजिरवाण्या क्षणांचा सामना करावा लागतो. अनेकांना हे लक्षात येत नाही की, खूप उपाय करूनही पायांची दुर्गंधी का येते? आज याच समस्येबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
काय असतं कारण?
पायांची दुर्गंधी येण्याचं मुख्य कारण असतं ओलावा येणे. घाम येतो हे सर्वांनाच माहीत असतं, पण त्यासोबत एक वेगळाच ओलावा येता. हा ओलावा आणि घाम यात फरक असतो. घाम आपल्याला शरीरावर तिथे येतो जिथे त्वचेवर रोमछिद्रे असतात किंवा केस असतात. पण एक खासप्रकारचा ओलावा तळहात आणि तळपायांवर येतो. या त्वचेवर रोमछिद्रे किंवा केस नसतात.
घाम येणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. घाम हा रोमछिद्रांमधून येतो. ही नैसर्गिक प्रक्रिया आरोग्यासाठी चांगली असते. गरम वातावरणात घाम येणे किंवा एक्सरसाइज करताना घाम येणे सामान्य बाब आहे.
धोक्याची घंटा
तळपाय किंवा तळहातांवर खासप्रकारचा ओलावा येण्याची समस्या त्या लोकांना अधिक होते जे फार चिंता करणारे असतात. तज्ज्ञ सांगतात की, तळपायाला किंवा तळहाताला ओलावा येणं अनेकदा याकडे इशारा करतात की, तुम्ही एखाद्या मानसिक दबावात आहात.
मेंटल हेल्थ
जर फार काळापासून तुम्हाला एखादं टेन्शन असेल किंवा स्ट्रेस असेल तर याचे आपल्या शरीरावर नकारात्मक प्रभाव दिसून येतात. त्यामुळे वेळीच टेन्शन आणि स्ट्रेस करण्याचा प्रयत्न करा. पाय आणि तळहातावर येणारा ओलावा मेंटल हेल्थबाबत याप्रकारचा संदेश देण्याचं काम करतो.
कुणाला होते समस्या?
आयुर्वेदानुसार, पाय आणि तळहातांवर ओलावा येण्याची समस्या जास्तीत जास्त चिंता करणाऱ्या लोकांमध्ये बघायला मिळते. हे लोक विचार अधिक करतात, पण जेवढा विचार तेवढा ते परफॉर्म करू शकत नाहीत. तसेच त्यांच्या डोक्यात सतत काहीना काही विचार सुरूच असतात.
कशी होते क्रिया
सतत विचारात गुंतून राहिल्याने हे लोक अधिक चांगल्याप्रकारे काम करू शकत नाही. त्यामुळे त्यांना इच्छेनुसार रिझल्ट मिळू शकत नाही. त्यामुळे ते अधिक तणावात येतात. या स्थितीत त्यांच्या तळपाय आणि तळहातांवर ओलावा येण्याची समस्या वाढते. कारण पाय अनेकदा शूजमध्ये बंद राहत असल्याने पायांची दुर्गंधी येते.
कशी कराल समस्या दूर?
- ही समस्या दूर करण्यासाठी सर्वातआधी टाइम मॅनेजमेंटकडे लक्ष द्या. आपली कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्यावर भर द्या. जेणेकरून तुमच्या मेंदूवर भार कमी पडेल आणि तुम्हाला हलकं व आनंदी वाटेल.
- एक्सरसाइज आणि वॉक सुरू करा. याने शरीरात रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि मेंदूमध्ये योग्य प्रमाणात ऑक्सिजन पोहोचतं. याने तणाव कमी होण्यास मदत मिळते.
- जास्त तळलेले पदार्थ खाऊ नका. फळं आणि भाज्यांचं अधिक सेवन करा. एक्सरसाइज केल्याने मेंदूत हॅपी हार्मोन्स रिलीज होतात. याने तणाव कमी होतो आणि मूड चांगला राहतो.
- जर हेल्दी डाएट आणि एक्सरसाइज करूनही तुमची पायांची दुर्गंधी दूर होत नसेल तर अशा स्थितीत वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.