Know the correct information about diabetes related myths and misconceptions from expert | डायबिटीसशी निगडीत गैरसमज कसे कराल दूर?; जाणून घ्या डॉक्टरांनी दिलेला महत्वाचा सल्ला

डायबिटीसशी निगडीत गैरसमज कसे कराल दूर?; जाणून घ्या डॉक्टरांनी दिलेला महत्वाचा सल्ला

डायबिटीसचा आजार उद्भवल्यास रुग्णांला वेगवेगळ्या प्रकरची पथ्य पाळावी लागतात. सामान्य लोकांपेक्षा वेगळी जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करावा लागतो. कारण अनेकांना डायबिटीस  झाल्यानंतर या आजाराबाबत पूर्ण आणि योग्य माहिती नसते.  त्यामुळेच या आजाराबाबत असलेले गैरसमज दूर करणं गरजेचं आहे. जेणेकरून तुम्हाला स्वतःच्या आणि कुटूंबातील लोकांच्या  तब्येतीची काळजी घेता येईल. नोव्हेंबर महिन्यात वर्ल्ड डायबिटीस डे सिरीज असते. या दरम्यान डायबिटीसशी निगडीत माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाते. ऑस्ट्रेलियन डायबिटीज एज्युकेटर असोसिएशन मान्यता प्राप्त डायबिटीज विशेषज्ञ स्वाती बाथवाल यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे

डायबिटीसबाबत कोणते गैरसमज आहेत?

हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की, डायबिटीसबाबत लोकांच्या मनात कोणत्या प्रकारचे चुकीचे समज आहेत.  डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार डायबिटीस असलेल्या लोकांना कोणताही एक आहार नसतो. आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश असून डॉक्टरांच्या सल्ल्याने डाएट प्लॅन घ्यायला हवा. 
साखरेचं सेवन कमी प्रमाणात केल्यास डायबिटीसचा धोका नसतो किंवा साखरेचं सेवन कमी केल्यास  डायबिटीस होणार नाही असाही गैरसमज अनेकांच्या मनात असतो. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येकाची आहार घेण्याची पद्धत वेगवेगळी असते. खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा, शारीरिक स्थिती, अनुवांशिकता यामुळेही हा आजार होऊ शकतो. 

डायबिटीस असलेले लोक आपल्या आहारात वेगवेगळ्या  फळांचा समावेश करू शकतात. पण त्याचे प्रमाण ठरलेले असते. फळांमध्ये नैसर्गिक  शुगर असते. लीची आणि टरबूज या फळांचे सेवन जास्त केल्याने शरीरातील साखरेचं प्रमाण वाढू शकतो. म्हणून या फळांचे कमीत कमी प्रमाणात सेवन करायला हवे. 
डायबिटीस पूर्णपणे बरा होऊ शकतो की नाही. असाही प्रश्न लोकांना पडतो.

तज्ज्ञ स्वाती बथवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार टाइप-2 डायबिटीसने शरीरात प्रवेश केल्यानंतर पॅनक्रियाजमधून इन्सुलिन निघून जाते. डायबिटीस नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. त्यासाठी  दररोज व्यायाम करायला हवा.   जीवनशैली चांगली असावी, जेवणाच्या तसंच खाण्यापिण्याच्या वेळा चुकवू नये.

फराळाचा आनंद घेताना डायबिटीस आणि वाढत्या वजनावर असं ठेवा नियंत्रण

जास्त न खाता प्रमाणात खा

जर तुम्हाला डायबिटीसची समस्या असेल तर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी एकाचवेळी खूप जास्त खाणं टाळा.  दिवसातून ३- ४ वेळा ठराविक वेळेचे अंतर ठेवून काहीतरी खात राहा. त्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होईल. याशिवाय शरीराला पोषक तत्व मिळतील. 

हेल्दी स्नॅक्स घ्या 

दिवाळीच्या वेळी मिठाई, पेठे खाण्यापासून रोखणं खूप कठीण असतं.  जर तुम्हाला डायबिटीसचा त्रास असेल तर कमीत कमी गोड पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा.  गोड खावंस वाटल्यास तुम्ही ताजी फळं खाऊ शकतं  तसंच जास्तीत जास्त पाणी प्या त्यामुळे त्वचा आणि शरीर हायड्रेट राहण्यास मदत होईल.

Diwali 2020 : How to control diabetes and weight in this festival season | दिवाळीत फराळाचा आनंद घेताना डायबिटीस आणि वाढत्या वजनावर कसं ठेवाल नियंत्रण?

गोड कमी खा

डायबिटीस असलेल्या लोकांनी असलेल्या  दुधाच्या चॉकलेटऐवजी डार्क चॉकलेट खावे. वास्तविक, डार्क चॉकलेटमध्ये साखर कमी प्रमाणात असते, ज्याचा आरोग्यावर फारसा परिणाम होत नाही. गोड पेयांचे  सेवन करण्यापेक्षा शुगर फ्री पेय किंवा नारळाचे पाणी हा उत्तम पर्याय ठरेल. 

मास्क धुवून उन्हात सुकवल्याने ९९.९९ % व्हायरस नष्ट होतो? जाणून घ्या दाव्यामागचं सत्य

ब्राऊस राईस खा

अनेकांना पांढरा भात अधिक खायला आवडतं. कारण  रोजच्या जेवणाचा तो भाग असतो.  पण डायबिटीसच्या रुग्णांनी पांढरे तांदूळ खाणे टाळावे. कारण त्या तांदळामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स जास्त असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीची वाढ होते. म्हणून पांढर्‍या तांदळाऐवजी ब्राऊस राईस खायला सुरूवात करा. दिवाळीच्या निमित्ताने या भाताचा आहारात समावेश केल्यास  रक्तातील साखर नियंत्रण राहील.

मोठा दिलासा! भारतातील बहुतेक लोकांना कोरोना लसीची गरज भासणार नाही?; एम्सच्या डॉक्टरांचा दावा

तळलेल्या पदार्थांचे अतिसेवन करू नका

दिवाळीनिमित्त विविध प्रकारचे तळलेले आणि मसालेदार पदार्थ तयार केले जातात. डायबिटीसच्या रुग्णांनी उत्सवाच्या वेळी , भजी, चकली यासारखे तळलेले पदार्थ खाऊ नयेत. याशिवाय, बिस्किट्स, केक यासारखे बेकरी पदार्थ पूर्णपणे टाळायला हवेत. जेणेकरून वजन वाढण्यापासून तसंच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्यापासून बचाव करता येऊ शकतो. याशिवाय मादत पदार्थाचे सेवन शारीरिक संतुलन बिघण्यासाठी  कारणीभूत ठरू शकतं. म्हणून  दारू, सिगारेट  अशा पदार्थाचे जास्त सेवन करू नका. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Know the correct information about diabetes related myths and misconceptions from expert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.