मास्क धुवून उन्हात सुकवल्याने ९९.९९ % व्हायरस नष्ट होतो? जाणून घ्या दाव्यामागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 06:53 PM2020-11-13T18:53:37+5:302020-11-13T18:55:22+5:30

CoronaVirus News & latest Updates : एसीएस अप्लाइड मेटिरयल अँड इंटरफेसेज या जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार मास्कवर चिकटलेले  व्हायरसचे कण संसर्गजन्य असतात.

Fack Check: Washing the mask and drying it in the sun destroys 99.99% of the virus | मास्क धुवून उन्हात सुकवल्याने ९९.९९ % व्हायरस नष्ट होतो? जाणून घ्या दाव्यामागचं सत्य

मास्क धुवून उन्हात सुकवल्याने ९९.९९ % व्हायरस नष्ट होतो? जाणून घ्या दाव्यामागचं सत्य

Next

कोरोनाकाळात मास्कचा वापर करणं गरजेचं आहे. जोपर्यंत  कोरोनाची लस उपलब्ध होत नाही. तोपर्यंत मास्कचा वापर शस्त्राप्रमाणे  केला जात आहे.  सध्या अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकानी एक असं सुती कापड तयार केलं आहे. ज्याचा मास्क वापरला तर तो मास्क केवळ एक तास सूर्यप्रकाशात ठेवून निर्जंतुक करता येणार आहे. हा मास्क सूर्यप्रकाशात ठेवला तर त्या कापडावर जमा झालेले 99. 99 टक्के व्हायरस आणि बॅक्टेरिया नष्ट होतील असा दावा संशोधकांनी केला आहे. एसीएस अप्लाइड मेटिरयल अँड इंटरफेसेज या जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार मास्कवर चिकटलेले  व्हायरसचे कण संसर्गजन्य असतात.

या संशोधनात अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठांतील संशोधकांचाही समावेश होता. त्यांनी मिशिगनमधील ३८ रुग्णालयांतील १६४८  कोविड-१९ रुग्णांच्या माहितीचं विश्लेषण केलं. यात त्यांना  दिसून आलं की ३९८ लोकांचा रुग्णालयात मृत्यु झाला. १२५० जण वाचले.  ४८८ रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर ६०  दिवसांनी त्यांची मुलाखत घेतल्यावर संशोधकनांना लक्षात आलं की त्यापैकी ३९ टक्के रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवल्यानंतर दोन महिन्यांनीही त्यांची दैनंदिन कामं करता येत नाहीयेत.  coronavirus: कोरोनाविरोधात यशस्वी ठरत असलेल्या Pfizer Vaccine ची भारतात असेल एवढी किंमत

व्हायरसमुळे कशामुळे मरतात?

कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी रोज बंगाल डाय कापडापासून हा मास्क तयार केला आहे. हे कापड सूर्यप्रकाशात आलं की फोटोसॅनिटायझरचं काम करते जवळपास.  एक तास हे कापड सूर्यप्रकाशात राहिलं की ते Reactive Oxygen Spices (ROS) उत्सर्जित करतं ज्यामुळे कापडावरचे सूक्ष्म विषाणू आणि जीवाणू मरतात. त्यामुळे तो मास्क धुण्यायोग्य आहे.परिणामी हा मास्क वारंवार वापरायला चालू शकतो. हे कापड सूर्यप्रकाशात आल्यावर ३० मिनिटांत टी ७ बॅक्टेरिया फेजला सक्रिय करतं. टी ७  बॅक्टेरियाफेज हा विषाणू कोरोना विषाणूच्या तुलनेत ORS साठी अधिक रोगप्रतिकारक आहे. कोरोनाच्या माहामारीने वाढला 'या' घातक आजाराचा धोका; २३ वर्षांनी रेकॉर्ड तोडला

प्लाझ्मा स्प्रेने 30 सेकंदांत कोरोना होतो नष्ट

दरम्यान एका नवीन संशोधनानुसार प्लाझ्माचा स्प्रे धातू, चामडे आणि प्लॅस्टिकच्या पृष्ठभागाला चिकटलेला कोरोनाव्हायरस अवघ्या 30 सेकंदांत मारू शकतो. हे संशोधन कोरोनाच्या लढाईत मोठी भूमिका निभावण्याची आशा निर्माण झाली आहे. प्लाझ्मा हा पदार्थाच्या चार महत्वाच्या अवस्थांपैकी एक आहे. हा प्लाझ्मा स्थिर गॅसवर गरम करून किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटीक फील्डच्या संपर्कात आणत बनविता येणार आहे. हे संशोधन फिजिक्स ऑफ फ्लूड्स नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.  जूनमध्ये हे संशोधन करण्यात आले आहे. यामध्ये कोल्ड प्लाझ्माचा उपयोग धातू, चामडे आणि प्लास्टिकसारख्या वस्तूंवर करण्यात आले. यावर बसलेले कोरोना व्हायरससारखे असंख्य विषाणू काही सेकंदांत नष्ट झाल्याचे दिसून आहे.

अमेरिकेच्या लॉस एंजेलिसयेथील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी कोरोना व्हायरसला मारण्यासाठी हा स्प्रे बनविला आहे. हा स्प्रे जास्त प्रेशरने जाण्यासाठी थ्री-डी प्रिंटरद्वारे जेट स्प्रे बॉटल बनविण्यात आली होती. हा स्प्रे प्लास्टिक, धातू, कार्डबोर्ड आणि लेदरच्या वस्तू जसे की बास्केटबॉल, फुटबॉल आणि बेसबॉलआदीवर मारण्यात आला.

Web Title: Fack Check: Washing the mask and drying it in the sun destroys 99.99% of the virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.