कोरोनाच्या माहामारीने वाढला 'या' घातक आजाराचा धोका; २३ वर्षांनी रेकॉर्ड तोडला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 02:39 PM2020-11-13T14:39:00+5:302020-11-13T14:47:13+5:30

CoronaVirus News & latest Updates : कोरोना व्हायरसमुळे लसीकरण न केल्याने गोवरच्या संक्रमणाचा धोका वाढला आहे.

Corona epidemic increases the risk of measles 23 year old record breaks at science | कोरोनाच्या माहामारीने वाढला 'या' घातक आजाराचा धोका; २३ वर्षांनी रेकॉर्ड तोडला

कोरोनाच्या माहामारीने वाढला 'या' घातक आजाराचा धोका; २३ वर्षांनी रेकॉर्ड तोडला

Next

कोरोनाच्या माहामारीत आता  सर्वाधिक लहान मुलांना उद्भवत असलेल्या गोवर या आजाराचा धोका वाढला आहे.  जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रिवेंशनच्या रिपोर्टमध्ये हा खुलासा करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार  २०१९ मध्ये गोवर या आजाराच्या संक्रमणाने 23 वर्षांचा रेकॉर्ड तोडला आहे. कोरोना व्हायरसमुळे लसीकरण न केल्याने गोवरच्या संक्रमणाचा धोका वाढला आहे.

जागतिक आरोग्य संघटना आणि सेंटर फॉर डिजीज कंट्रोलकडून  गुरूवारी एक रिपोर्ट  देण्यात आला होता. या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं की,  2019 मध्ये  संक्रमित लोकांची  संख्या वाढून 869,770  इतकी झाली आहे. 2019 मध्ये आकड्यांची तुलना केल्यास दिसून आले की, गंभीर आजाराने मृत्यू झालेल्यांमध्ये  50 टक्क्यांनी वाढ झाली.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार  लसीकरणामुळे गोवरच्या रुग्णांची संख्या कमी झाली होती. पण कोरोना व्हायरसचं संक्रमण पसरल्यानंतर या आजाराचे लसीकरण थांबवण्यात आहे. त्यामुळे जवळपास  ९४ टक्के लोकांना या आजाराचा सामना करावा लागला.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख अधिकारी नताशा क्राउक्रॉफ्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार हा आजार जंगलात लागलेल्या आगीप्रमाणे पसरत जातो. त्यांनी सांगितले की, 73 टक्के गोवर या आजाराचा धोका ९ देशांमध्ये आहे. या संक्रमणाचा सगळ्यात जास्त धोका  कांगो, मादागास्कर, जॉर्जिया, कजाकिस्तान आणि युक्रेनमध्ये पसरला आहे.

मागच्या वर्षी या आजाराने मृत्यू झालेल्यांची संख्या 2 लाख 700 इतकी होती. लस समुह प्रमुख सेठ बर्कले यांनी सांगितले की गोवरमुळे मृत्यू होणं ही गंभीर बाब आहे. कारण संक्रमण रोखण्यासाठी लस असूनही ही स्थिती उद्भवत आहे. गोवर हा विषाणूजन्य आजार असल्याने विशिष्ट असे औषध त्यावर नाही. लक्षणांनुसार त्यावर उपचार केले जातात. आनंदाची बातमी! रशियन कंपनीची स्पुटनिक -व्ही कोरोना लस ९२ टक्के ठरली प्रभावी

गोवरमध्ये  कपाळावर, कानामागे, मानेवर पुळ्या येतात. नंतर ते हाता-पायापर्यंत पसरतात. पुळ्या आल्यानंतर हळूहळू  ताप यायला सुरूवात होते. पुरळ साधारणपणे आठवडय़ानंतर हळूहळू कमी होत जाते. त्वचेवर त्याचे काळपट व्रण काही दिवस राहतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे खोकला जाण्यास दोन आठवडे लागतात. हा आजार कोणत्याही वयोगटात होऊ शकतो. गोवर झालेल्या रुग्णामध्ये शरीरातील ‘अ’ जीवनसत्त्वाची मात्रा खूप कमी होते. साधारणपणे कुपोषित बालकांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त आढळते. ICMR अन् सिरम इन्स्टिट्यूट कोरोना लसीवर एकत्र काम करणार; लवकरच यशस्वी लस येणार

Web Title: Corona epidemic increases the risk of measles 23 year old record breaks at science

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.