शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
2
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
4
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
5
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
6
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
7
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
8
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
9
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
10
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
11
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
12
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
13
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
14
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
15
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
16
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
17
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
18
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
19
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
20
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...

टेन्शन-स्ट्रेस असेल तर 'या' क्लबमध्ये जा आणि ढसाढसा रडा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 11:11 AM

तुम्ही आतापर्यंत हसवणाऱ्या क्लब किंवा लाफ्टर थेरपीबाबत ऐकलं असेलच, पण जगात असेही काही क्लब आहेत, जिथे लोक केवळ रडण्यासाठी येतात. पण असं का?

तुम्ही आतापर्यंत हसवणाऱ्या क्लब किंवा लाफ्टर थेरपीबाबत ऐकलं असेलच, पण जगात असेही काही क्लब आहेत, जिथे लोक केवळ रडण्यासाठी येतात. पण असं का? काय रडणं फायदेशीर असतं? सूरतमध्ये एक असा क्लब आहे जिथे लोक केवळ रडण्यासाठी येतात आणि जोरजोरात रडतात. असे मानले जाते की, रडल्यामुळे त्यांचा स्ट्रेस कमी होतो.  

हा क्लब सुरू करणारे लोक इथे येणाऱ्या लोकांना नियमित रडण्यासाठी प्रोत्साहित करतात. कारण रडणे ही एकप्रकारची एक्सरसाइज आहे आणि याचे अनेक फायदेही आहेत. क्लबमधील एक्सपर्ट्स सांगतात की, लोकांनी स्वत:ला रडण्यापासून रोखू नये, कारण अश्रूमधून एक केमिकल निघतं, या केमिकलला कोर्टिसॉल म्हटलं जातं. हे केमिकल मानवी शरीरासाठी फारच घातक मानलं जातं. त्यामुळे व्यक्तीला जेव्हाही संधी मिळेल तेव्हा रडले पाहिजे, जेणेकरून हे केमिकल शरीरातून बाहेर येण्यास मदत मिळेल. याने व्यक्तीचं टेन्शन, चिंता आणि डिप्रेशन वाढतं.  

रडण्याचा क्लब हे ऐकायला जरा वेगळे वाटत असले तरी या क्लबमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सामान्यपणे असं मानलं जातं की, जास्त रडल्याने व्यक्ती चिंताग्रस्त होतो आणि कमजोरी सुद्धा येते. मात्र रडणं देखील हसणं आणि आनंद मिळण्यासारखी एक भावना आहे. जी व्यक्त होणं शरीरासाठी गरजेचं आहे. ज्याप्रकारे हसल्याने शरीरात एंडॉर्फिन हार्मोन रिलीज होता आणि व्यक्तीला आनंद होतो, त्याचप्रमाणे रडल्याने शरीरातून कोर्टिसॉल बाहेर येत. 

रडण्याबाबत जगभरात वेगवेगळे अभ्यास करण्यात आले. ज्यात ३ हजार पेक्षा जास्त लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. त्यातही रडण्याचे फायदे सांगण्यात आले आहेत. याआधी रडण्याचे फायदे जाणून त्यासाठी विशेष सुविधा सुरू करण्यात आली आहे. 

(Image Credit : Penn Medicine)

रडण्याच्या फायद्यांवर शोध

जपानमधील एका हायस्कूलमधील ४३ वर्षीय शिक्षिका हीदेफूमी योशिदा यांनी पाच वर्षांआधी रडण्यातून होणाऱ्या फायद्यांवर शोध आणि प्रयोग सुरु केला. आता त्यांना जपानमध्ये नामिदा सेंसेई म्हणजेच टीयर्स टीचर म्हणून ओळखले जाते. योशिदा यांना जपानी कंपनी आणि शाळांमध्ये मागणी वाढली आहे. त्यांना कंपन्या आणि शाळांमध्ये रडण्याचे फायदे सांगण्यासाठी बोलवलं जातं.   

जपान सरकारने उचलले पाऊल

योशिदा यांच्या रडून तणावमुक्ती करण्याच्या एक्सपरिमेंट्सवर तोहो यूनिव्हर्सिटीच्या मेडिसिन फॅकल्टीचे प्रमुख प्रोफेसर हिदेहो अरिटा यांनीही शोध केला. या दोघांच्या प्रयोग आणि रिसर्चमधून हे सिद्ध झालंय की, हसण्या आणि झोपण्यापेक्षा रडल्याने तणावमुक्ती अधिक लवकर होते. आठवड्यातून एकदा रडल्याने स्ट्रेस फ्री लाईफ जगण्यास मदत मिळते. या शोधातून निघालेले परिणाम पाहता जपान सरकारने २०१५ मध्ये ५० पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कंपन्यांमध्ये तणावमुक्तीसाठी हे पाऊल उचलणे अनिवार्य केले होते. 

मानसोपचार तज्ज्ञही देतात रडण्याचा सल्ला

रडणे आणि तणाव यांच्यातील संबंध जाणून घेण्यासाठी १६ वर्षांआधी ३० देशांमध्ये एक सर्वे झाला होता. या सर्वेमध्ये सहभागी असलेल्या ६० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी हे मान्य केले होते की, तणावसोबत लढण्यासाठी त्यांना रडणे हा चांगला पर्याय वाटतो. तेच जगातल्या ७० टक्के मानसोपचार तज्ज्ञ तणावाने ग्रस्त असलेल्या लोकांना रडण्याचा सल्ला देतात. 

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सMental Health Tipsमानसिक आरोग्यResearchसंशोधन