काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री ब्रूना अब्दुल्लाहने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. जो सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. ब्रूना अब्दुल्लाहने वॉटर बर्थ मार्फत बाळाला जन्म दिला. त्यावेळीचा एक फोटो तिने आपल्या इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे.

ब्रूनाने असं लिहिलं आहे की, गरोदर असताना ती बाळा जन्म देताना कमीत कमी त्रास व्हावा अशी पद्धत ती शोधत होती. तसेच तिला देण्यात येणाऱ्या औषधांचा परिणाम तिच्या बाळावर व्हावा असं अजिबात वाटतं नव्हतं.

सध्या वॉटर बर्थचा ट्रेन्ड प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये आईला बाळाला जन्म देताना 45 टक्क्यांनी कमी वेदना होतात. जाणून घेऊया वॉटर बर्थ हा प्रकार नेमका आहे तरि काय? 

काय आहे वॉटर बर्थ? 

वॉटर बर्थ बाळाला जन्म देण्याचा एक प्रकार आहे. जसं सिजेरियन किंवा नॉर्मल डिलिवरी असे प्रकार असतात. तसाच हादेखील एक प्रकार आहे. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, वॉटर बर्थ डिलिवरी नार्मल डिलिवरीचाच एक आधुनिक प्रकार आहे. ज्यामध्ये पाण्याचा वापर करण्यात येतो. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, या प्रोसेसमध्ये प्रसूती कळा कमी होतात आणि बाळाला जन्म देताना आईला कमी त्रास होतो. पाण्याच्या आतमध्ये असल्यामुळे महिलेच्या शरीरामध्ये एंड्रोफिन हार्मोन जास्त प्रमाणात रिलिज होतात. ज्यामुळे वेदना कमी होतात. तसेच असं सांगण्यात येतं की, जर वॉटर बर्थसाठी गरम पाण्याचा वापर करण्यात आला तर वेदना एवढ्या कमी होतात की, महिलेला पेन किलर देण्याची अजिबात गरज भासत नाही. 

प्रसूती दरम्यान महिलांचा तणाव 60 टक्क्यांनी होतो कमी 

वॉटर बर्थ डिलिवरीमध्ये महिलांचा तणाव नॉर्मल डिलिवरीपेक्षा 60 टक्क्यांनी कमी होतो. डॉक्टर्सच्या म्हणण्यानुासार, नॉर्मल डिलिवरीमध्ये बाळाला जन्म देताना योनीवर फार ताण पडतो. पम तोच ताण वॉटर बर्थमध्ये कमी होतो. कारण गरम पाण्याच्या संपर्कात आल्याने टिश्यू सॉफ्ट होतात. याच कारणामुळे महिलांना वेदना कमी होतात. 

कशी करतात डिलिवरी? 

वॉटर बर्थ डिलिवरीसाठी एक कोमट पाण्याचा बर्थिंग पूल तयार करण्यात येतो. ज्यामध्ये जवळपास 300 लीटरपासून 500 लीटरपर्यंत पाणी भरण्यात येतं. या पूलातील पाण्याचं टेम्प्रेचर एकसारखं ठेवण्यासाठी अनेक वॉटरप्रूफ उपकरणं लावण्यात येतात. खासकरून डिलिवरीदरम्यान होणारं इन्फेक्शन रोखण्यासाठी ही उपकरणं मदत करतात. हा पूल जवळपास अडिच ते तीन फुटांचा असतो. हा महिलेच्या शरीरानुसार, अ‍ॅडजस्ट केला जातो. लेबर पेन सुरू झाल्यानंतर तीन ते चार तासांनंतर महिलांना या पूलमध्ये ठेवलं जातं. डॉक्टर्सच्या म्हणण्यानुसार, नॉर्मल डिलिवरीपेक्षा कमी वेळात या पद्धतीने बाळाचा जन्म होतो. जर ही पद्धत योग्यरित्य फॉलो केली तर बाळाला जन्म देण्यासाठी वॉटर बर्थ थेरपी उत्तम पर्याय ठरते. 

आई आणि बाळ राहतं इन्फेक्शन फ्री

वॉटर बर्थ पद्धतीमध्ये आई आणि बाळाला इन्फेक्शन होण्याचा धोका 80 टक्क्यांनी कमी होतो. असं सांगितलं जातं की, यामध्ये आई आणि बाळाला दूर ठेवण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या पद्धतीचा वापर करण्यात येतो. याव्यतिरिक्त यादरम्यान महिला पाण्यामध्ये असल्यामुळे ब्लड प्रेशर कमी होतं आमि टेन्शन, एग्जायटीची समस्याही होत नाही. 

बाळाला मिळतं आईच्या गर्भाप्रमाणे वातावरण 

डॉक्टर्स असं म्हणतात की, नॉर्मल आणि सिजेरियन ऑपरेशनच्या तुलनेमध्ये वॉटर बर्थ उत्तम असतं. तसेच ते हेदेखील सांगतात की, या पद्धतीमध्ये बाळाला आईच्या गर्भाप्रमाणे वातावरण मिळतं. पाण्यामुळे बाळाच्या शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशनही योग्य राहतं. तसेच बाळाला गर्भातीलच वातावरण मिळाल्यामुळे चुकीच्या पद्धतीने मूव्ह करण्याचे चान्सेस कमी होतात.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

Web Title: Know about water birth and its advantage over normal delivery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.