अरे व्वा! गुडघ्यांवरील शस्त्रक्रिया कमी वेदनादायी होण्यासाठी एक नवीन तंत्र विकसित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 04:13 PM2021-03-09T16:13:47+5:302021-03-09T16:18:26+5:30

Knee surgery new technique : गुडघा बदलण्याची बिनटाकी शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्जही लवकर मिळतो.  काही आजार, रुग्णाचे वय किंवा एखादे फ्रॅक्चर यांमुळे सांधेदुखी निर्माण होते, तेव्हा गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया केली जाते.

Knee surgery develops a new technique to make it less painful | अरे व्वा! गुडघ्यांवरील शस्त्रक्रिया कमी वेदनादायी होण्यासाठी एक नवीन तंत्र विकसित

अरे व्वा! गुडघ्यांवरील शस्त्रक्रिया कमी वेदनादायी होण्यासाठी एक नवीन तंत्र विकसित

Next

डॉ. संदीप वासनिक, सल्लागार, जॉइंट रिप्लेसमेंट अँड ऑर्थोपेडिक सर्जन, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई

सर्व वयोगटातील लोकांमध्ये गुडघा दुखणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. या दुखण्याचे पर्यवसान अनेकदा गुडघ्यावरील शस्त्रक्रियेमध्ये होते. गुडघ्याचा दुखरा किंवा व्यवस्थित काम न करणारा भाग बदलून त्याजागी कृत्रिम भाग या शस्त्रक्रियेमध्ये बसविला जातो. त्यास अंशतः किंवा संपूर्ण गुडघा बदलणे असे म्हणतात. सांधा बदलण्याच्या या शस्त्रक्रिया बिनटाकी पद्धतीने केल्यास, रुग्णांना त्यातून मोठा दिलासा मिळतो. यामुळे रुग्णांना वेदना कमी होतात, ते लवकर बरे होतात आणि त्यांना रुग्णालयात वारंवार येण्याचा त्रासही होत नाही. गुडघा बदलण्याची बिनटाकी शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्जही लवकर मिळतो.  काही आजार, रुग्णाचे वय किंवा एखादे फ्रॅक्चर यांमुळे सांधेदुखी निर्माण होते, तेव्हा गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया केली जाते.

ओस्टिओआर्थ्रिटीस’ या आजाराचे भारतातील वाढते प्रमाण ही चिंतेची बाब आहे. हे प्रमाण सामान्यतः 23 ते 41 टक्के इतके आढळते. या आजारावर दीर्घकालीन समाधान म्हणून संपूर्ण गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो. बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेमध्ये जखम जोडण्यासाठी स्किन ग्ल्यूचा वापर केला जातो व जखम शिवण्यासाठी नेहमीचे टाके घालणे टाळले जाते. या नवीन तंत्रामुळे शस्त्रक्रियेनंतर टाके काढून घेण्याची वेदनादायक प्रक्रियाही टाळता येते, रुग्णांना पाठपुरावा करतानाही वेदना होत नाहीत व रक्तही कमीतकमी येते. 

या तंत्रामध्ये वापरण्यात येणारे उत्पादन 2014 मध्ये अमेरिकेत सादर करण्यात आले होते. भारतात ते नुकतेच सादर झाले व 2017 मध्ये त्याचा वापर सुरू झाला. या तंत्राचे काही मुख्य फायदे पुढीलप्रमाणेः

रूग्णालयात पाठपुरावा करण्याची कमी गरज; सध्याच्या कोरोना साथीच्या काळात तर या तंत्राला प्राधान्य देण्याची अधिक आवश्यकता. आम्ही हे तंत्र अवलंबिल्यामुळे रुग्णांचे रुग्णालयात पुन्हा दाखल होण्याचे प्रमाण कमी झाले.

ड्रेसिंग्जची कमीतकमी गरज; खरे तर ड्रेसिंग काढण्याची किंवा बदलत राहण्याची काहीच गरज नाही. 

शस्त्रक्रिया केल्यानंतर जखमेच्या जागी कोणतेही व्रण शिल्लक राहात नसल्यामुळे, जखमेवर टाके घालण्याच्या पद्धतीपेक्षा ही बिनटाक्याची पद्धत अधिक सोयीस्कर.

शस्त्रक्रियेनंतर थोड्याच वेळात रुग्ण शॉवर घेऊ शकतो. शस्त्रक्रियेनंतरच्या जखमेवर ग्ल्यू लावल्याने ती सीलबंद होते आणि बाहेरच्या वातावरणातील संसर्गापासून तिचा बचाव होतो. 

गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रिया जटिल असतात. गुडघ्याचे भाग बदलल्यानंतर आतील बाजूस टाके घातले जातात आणि बाहेरील त्वचेवर एक जाळी व स्किन ग्ल्यू वापरतात. जाळीवर ग्ल्यू लावण्याच्या पद्धतीमुळे त्वचेवर एक जलरोधक, लवचिक स्वरुपाचा थर निर्माण होतो आणि जखम बरी होण्यासाठी योग्य वातावरण मिळते. शस्त्रक्रियेच्या एकंदर वेळेची बचत होते आणि रुग्णही लवकर बरा होतो. अर्थात, सर्जन्सनी हे तंत्र वापरण्यासाठी आवश्यक असलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. या तंत्राने जखम बरी होण्याकरीता ती कोरडी असणे, तिच्यातील रक्तस्त्राव थांबलेला असणे आणि जखमेवरील त्वचेच्या कडा एकमेकांना चिकटलेल्या असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त आणखीही काही सावधगिरी बाळगणे गरजेचे असते.  International Women's Day: आता महिला बिंधास्तपणे वापरू शकतात Menstrual Cups; असा करा वापर

एका महिला रूग्णाची डाव्या बाजूचा संपूर्ण गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया (टीकेआर) पूर्वी झाली होती. तिच्या उजव्या बाजूची टीकेआर करावयाची होती. आम्ही तिला या नव्या तंत्राची माहिती दिली. त्यास तिने संमती दिली. शस्त्रक्रिया झाल्यावर तिने आपला आनंद व्यक्त केला. तिने नमूद केले, की डाव्या बाजूची शस्त्रक्रिया पारंपरिक पद्धतीने, टाके घालून करण्यात आली होती. त्यामध्ये टाके काढण्याची क्रिया खूपच वेदनादायी होती. ग्ल्यू लावण्याच्या नव्या तंत्राने टाके काढण्याची गरज राहिली नसल्याने तिला वेदना झाल्या नाहीत. ती आनंदी होती. डाव्या गुडघ्यावरही याच नव्या तंत्राने ‘टीकेआर’ करायला हवी होती, असे तिचे म्हणणे होते. सावधान! टॉयलेटमध्ये तुम्हीही रोज हीच चूक करत असाल तर आरोग्याचं होऊ शकतं मोठं नुकसान, जाणून घ्या कसं

Web Title: Knee surgery develops a new technique to make it less painful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.