किडन्यांमध्ये पाण्याने भरलेले फोड येणं; असू शकतो 'या' आजाराचा धोका, जाणून घ्या लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 12:22 PM2020-05-07T12:22:34+5:302020-05-07T12:34:32+5:30

सिस्ट तयार  झाल्यानंतर सामान्य वाटणारी लक्षणं दिसून येतात. या लक्षणांकडे लक्ष न दिल्यामुळे समस्या वाढत जाते.

Kidney Cysts symptoms diagnosis and treatment myb | किडन्यांमध्ये पाण्याने भरलेले फोड येणं; असू शकतो 'या' आजाराचा धोका, जाणून घ्या लक्षणं

किडन्यांमध्ये पाण्याने भरलेले फोड येणं; असू शकतो 'या' आजाराचा धोका, जाणून घ्या लक्षणं

googlenewsNext

किडनी हा शरीरातील महत्वपूर्ण अवयव आहे. चुकिच्या सवयी, खाण्यापिण्यातील अनियमीतता, जीवनशैलीतील बदल यांचा परिणाम थेट किडनीवर होत असतो. तुमचा विश्वास बसणार नाही पण सध्या जंक फूडच्या अतिसेवनामुळे किडनीवर परिणाम होऊन वेगवेगळे आजार उद्भवत आहे. या आजारांची सुरूवातीची लक्षणं गंभीर नसल्यामुळे रुग्णाला  किडनीच्या आजाराबाबत काहीही कल्पना नसते. थकवा येणं, पोटात दुखणं. अशी लक्षणं दिसायला सुरूवात होते.  

त्यावेळी किडनी ६० टक्क्यांपेक्षा जास्त खराब झालेली असू शकते. या आजारात किडनीमध्ये सिंपल किडनी सिस्ट्सची समस्या उद्भवते. या आजारात रुग्णाच्या किडनीत पाण्याने भरलेले फोड यायला सुरूवात होते. या फोडांना सिस्ट असं म्हणतात. यामुळे किडनीच्या कार्यावर नकारात्मक प्रभाव पडतो.

किडनी सिस्ट

काही रुग्णांना एकच किडनी सिस्ट असतो. तर काहींच्या किडनीमध्ये अनेक सिस्ट असतात. हे सिस्ट गोलाकार असतात. एका लहानश्या दाण्यापासून ते बॉलच्या आकारापर्यंत सिस्टचा आकार असू शकतो. सिस्ट तयार  झाल्यानंतर सामान्य वाटणारी लक्षणं दिसून येतात. या लक्षणांकडे लक्ष न दिल्यामुळे समस्या वाढत जाते.  

लक्षणं

पोटात दुखणं, 

किडनीला सुज येणं

थकवा, ताप जाणवणं

रक्तदाब वाढणं

लघवी करताना रक्तबाहेर येणं

ही लक्षणं किडनी सिस्टप्रमाणेच इतर आजारांची सुद्धा असू शकतात. सिस्टची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने सीटी स्कॅन  किंवा एमआरआय चाचणी करण्याची आवश्यकता असते. ट्यूमर सिस्टची तपासणी करण्यासाठी किडनी फंक्शन टेस्ट सुद्धा केली जाते. 

उपाय

जर एखाद्या व्यक्तीला एकापेक्षा जास्त किडनी सिस्ट झाले असतील तर  त्या व्यक्तीने सगळ्यात आधी डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यायला हवी. सुरूवातीच्या लक्षणांवर आधारीत डॉक्टर उपचार करू शकतात. पण गंभीर स्थिती उद्भवल्यास स्क्लेरोथेरेपीचा वापर करून किडनीमधील पाण्याने भरलेले फोट काढून टाकले जातात. किडनीत झालेल्या सिस्टचं प्रमाण जास्त असेल तर लॅप्रोस्कोपिक सर्जरी करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. (हे पण वाचा-फुप्फुसांमध्ये जमा झालेली घाण स्वच्छ करण्यासाठी 'या' ४ पदार्थांचा करा वापर)

Web Title: Kidney Cysts symptoms diagnosis and treatment myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.