शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

​हिवाळ्यात जपा हृदयाला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 18:31 IST

विशेषत: हिवाळ्यात रक्त घट्ट झाल्याने शरीरात रक्तप्रवाह सुरळीत होत नसतो त्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. अशा वेळी हिवाळ्यात हृदयाची काळजी घेणे अत्यावश्यक असते.

विशेषत: हिवाळ्यात रक्त घट्ट झाल्याने शरीरात रक्तप्रवाह सुरळीत होत नसतो त्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. अशा वेळी हिवाळ्यात हृदयाची काळजी घेणे अत्यावश्यक असते. हिवाळ्यात उतरलेला पारा हा लहान मुले व वयोवृद्धांसाठी घातकच ठरतो. शिवाय उच्च रक्तदाब व हृदयरुग्णांसाठी देखील तितकीच घातक आहे. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी हिवाळ्यातील सगळ्यात मोठी समस्या म्हणजे घाम न येणे. यामुळे शरीरातील मिठाचे प्रमाण वाढते. मिठाचे प्रमाण वाढले की रक्तदाब वाढतो. काय काळजी घ्याल* हिवाळ्यात पहाटे अधिक थंड वातावरण असल्याने हृदयरुग्ण व उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी सकाळच्या वेळी फिरणे टाळावे. त्याऐवजी संध्याकाळी फिरावे किंवा व्यायाम करावा. या रुग्णांनी घाम येईपर्यंत चालावे किंवा व्यायाम करावा.* थंडीत शारीरिक हालचाल कमी झाल्यानेदेखील रक्तदाब वाढू शकतो. त्यामुळे हार्ट अटॅकची शक्यता वाढते. सर्दीत धमन्या आकुंचन पावतात. त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता वाढते. हृदयरुग्णांसाठी ही धोक्याची घंटा आहे. म्हणून हिवाळ्यात हृदयरोग्यांनी तेलकट खाद्यपदार्थांपासून दूर राहणे गरजेचे आहे. * उच्च रक्तदाब व हृदयरुग्णांना सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे. हिवाळ्यात शरीर व कान गरम कापडाने झाकून ठेवा. थोडेसे दुर्लक्ष चिंतेचे कारण ठरु शकते.