Janmashtami Special Prasad: जन्माष्टमीला नैवेद्य म्हणून दाखवण्यात येणारे 'हे' पदार्थ आरोग्यासाठी लाभदायक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 15:22 IST2018-09-02T11:09:01+5:302019-08-22T15:22:51+5:30
Janmashtami 2019 : आज कृष्ण जन्माष्टमी... हा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जन्माष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता श्रीकृष्णाची पूजा करण्यात येते. अशी मान्यता आहे की, या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या आठव्या अवताराने जन्म घेतला होता.

Janmashtami Special Prasad: जन्माष्टमीला नैवेद्य म्हणून दाखवण्यात येणारे 'हे' पदार्थ आरोग्यासाठी लाभदायक!
Janmashtami 2018 : आज कृष्ण जन्माष्टमी... हा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जन्माष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता श्रीकृष्णाची पूजा करण्यात येते. अशी मान्यता आहे की, या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या आठव्या अवताराने जन्म घेतला होता. या दिवशी श्रीकृष्णाला पंचामृत, माखन मिश्री (लोणी आणि साखर एकत्र करून तयार केलेला पदार्थ), धनिया पंजीरी (धना पावडर आणि मखाने यांच्यापासून तयार केलेला पदार्थ) आणि फळं यांसारख्या पदार्थांचे नैवेद्य दाखवण्यात येतात. तसेच प्रसाद म्हणूनही हे पदार्थ खाल्ले जातात. हे पदार्थ खाण्यासाठी जेवढे चविष्ट असतात तेवढेचं आरोग्यासाठीही लाभदायक असतात. यांमुळे डायबिटिज, कॅन्सर, लठ्ठपणा आणि इन्फेक्शनसारख्या आजारांपासून शरीराचा बचाव होतो. न्यूट्रिशनिश्ट आणि डाएटीशियन शिखा ए शर्मा या श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून दाखवण्यात येणाऱ्या पदार्थांचे आरोग्यदायी फायदे सांगत आहेत.
1. पंचामृत

2. नारळ

3. माखण मिश्री (लोणी आणि साखर एकत्र करून तयार केलेला पदार्थ)

4. धनिया पंजीरी

शुद्ध तुपामध्ये धने किंवा धन्याची पावडत टाकून हा पदार्था तयार करण्यात येतो. याव्यतिरिक्त यांमध्ये ड्राय फ्रुट्सदेखील टाकले जातात. ज्यामुळे हा हेल्दी प्रसाद मानला जातो. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. त्याचप्रमाणे हा पदार्थ खाल्याने ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. तसेच इन्फेक्शनपासूनही शरीराचा बचाव होतो.
5. फळं
या प्रसादामध्ये केळी, सफरचंद आणि मोसंबी यांसारखी फळं एकत्र केली जातात. फळांमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, अॅन्टी ऑक्सिडंट, फायबर यांसारखी पोषक तत्व आढळून येतात. फळांमधील ही पोषक तत्व कॅन्सर, डायबिटीज आणि हृदयाशी निगडीत आजारांपासून शरीराचं रक्षण करतात.