शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

सेलिब्रिटी नव्हे तर आहेत IPS, सेल्फीसाठी तरुणींची नेहमी असते झुंबड !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 12:32 IST

२२ व्या वर्षीच बनले IPS, या अधिकाऱ्याचे जाणून घ्या फिटनेस रहस्य ...!

आपण एखादा सेलिब्रिटी प्रत्येक्षात पाहिला की, त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी धडपडतो. आपल्या सारखेच सेलिब्रिटींचे लाखो चाहते असतात. आपण नेहमी त्यांच्या अवतीभोवती चाहत्यांचा गराडा पाहत असतो. मात्र सध्या अशाच प्रकारचा तरुण चाहत्यांचा गराडा एखाद्या सेलिब्रिटीच्या मागे नव्हे तर एका आयपीएस अधिकाऱ्याच्या मागे दिसून येत आहे. सचिन अतुलकर फिटनेसच्या बाबतीत पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी-कर्मचाऱ्यासाठी आयकॉन ठरत आहे. ते २२ व्या वर्षीच आपीएस बनले आहेत. सचिन अतुलकर जिथेही जातात तिथे तरुण-तरुणी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी धावपळ करतात. विशेष म्हणजे ते एवढ्या बिझी शेड्यूलमध्येही फिटनेस टिकविण्यासाठी रेग्युलर वेळ देऊन एक्झरसाइज आणि योगा करतात. ते नेहमी दुसऱ्यानादेखील फिट राहण्यासाठी प्रेरित करीत असतात.सचिन अतुलकर २००७ च्या बॅचमध्ये पासआउट झालेत आणि २२ व्या वर्षीच आयपीएस बनले. त्यांनी गॅ्रज्युएशन नंतर अटेंप्ट केले आणि पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले. त्यांचा जन्म भोपाळमध्ये झाला आहे. त्यांचे वडील फॉरेस्ट सर्विसमधून निवृत्त झाले आहेत आणि भाऊ भारतीय सैन्यात कार्यरत आहेत. सचिन यांनी १९९९ मध्ये क्रिकेट खेळात राष्ट्रीय पातळी पर्यंत मजल मारली आहे आणि त्यांना २०१० मध्ये गोल्ड मेडलदेखील मिळाले आहे.   * हे आहे त्यांच्या फिटनेसचे रहस्य  - IPS सचिन हे नेहमी बिझी असतात, मात्र एवढ्या बिझी शेड्युलमधूनही ते वेळ काढतात आणि आपल्या फिटनेसवर लक्ष देतात. - त्यांची परफेक्ट बॉडी बनविण्यामागे त्यांच्या कोचचे मार्गदर्शन असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सचिन रोज त्यांच्या मार्गदर्शनाने एक्झरसाइज आणि ओकेजनली योगा करतात. - एक्झरसाइज केल्याने ताणतणाव दूर होतो आणि माइंडदेखील फ्रेश राहतो ज्यामुळे ते अधिक चांगल्या प्रकारे आपले कर्तव्य बजावू शकतात असे त्यांचे म्हणणे आहे.  - बॉडी बिल्डिंगमुळे चांगले व्यक्तिमत्त्व, माइंड आणि बॉडी चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊ शकते असेही त्यांचे म्हणणे आहे.  * IPS  सचिन आपल्या फिटनेससाठी आठवड्याभरात खालील प्लॅन फॉलो करतोे...   -पहिल्या दिवशी चेस्ट आणि ट्रायशेप एक्झरसाइज करतात.-दुसऱ्या दिवशी बॅक आणि ट्रायशेप एक्झरसाइज करतात. -तिसऱ्या दिवशी काही कार्डियालादेखील एक्झरसाइजमध्ये समावेश करतात. -चवथ्या दिवशी पायांसाठी स्ट्रेचिंग आणि रिलेक्सिंग करतात.  -पाचव्या दिवशी कार्डिया एक्झरसाइज करतात.  -सहाव्या दिवशी आपल्या शरीराचे सर्वात विक पार्ट्ससाठी वेळ देतात.  -सातव्या दिवशी काहीच करत नाही, म्हणजेच माइंड आणि बॉडीला आराम देतात.