International Yoga Day 2019 : सेलिब्रिटी कोणता योगाभ्यास करुन स्वत:ला ठेवतात स्लिम आणि फिट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 10:17 IST2019-06-21T10:15:06+5:302019-06-21T10:17:13+5:30
जगभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने सर्वसामान्य नागरिकांसोबतच सेलिब्रिटीही योगा करुन लोकांना योगाभ्यासाचं महत्त्व पटवून सांगत आहेत.

International Yoga Day 2019 : सेलिब्रिटी कोणता योगाभ्यास करुन स्वत:ला ठेवतात स्लिम आणि फिट!
जगभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने सर्वसामान्य नागरिकांसोबतच सेलिब्रिटीहीयोगा करुन लोकांना योगाभ्यासाचं महत्त्व पटवून सांगत आहेत. सेलिब्रिटींची फिटनेस नेहमीच चर्चेचा विषय असते. त्यांच्या फिटनेससाठी ते किती मेहनत घेतात हेही आपण बघत असतो. त्यांच्यासारखंच आपणही दिसावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे सेलिब्रिटींना फॉलो करणारे अनेकजण असतात. अशात सेलिब्रिटी कोणत्या योगाभ्यासाने स्वत:ला फिट ठेवतात हे जाणून घेऊ.
फिट आणि हेल्दी राहण्यासाठी सेलिब्रिटींनी आता आपल्या रुटीन वर्कआउटमध्ये योगाभ्यासाचाही समावेश केला आहे. शिल्पा शेट्टी, करिना कपूर. जॅकलिन फर्नांडिस, बिपाशा बसु यांसारखे स्टार योगासने करून आपल्या फिटनेसची काळजी घेतात. हे लोक योगासनांबाबत जनजागृती करण्यासाठीही वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये सहभागी होत असतात. चला जाणून घेऊया बॉलिवूडचे कलाकार कोणत्या योगासनांना देतात प्राधान्य...
शिल्पा शेट्टी
शिल्पा शेट्टीने योगासनांची सुरुवात डोकेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी केली होती. याचे फायदे आणि परिणाम जाणून घेतल्यावर तिने योगासने केवळ फॉलोच केले नाहीतर त्याची एक सीडीही लॉन्च केली. प्रेग्नन्सीनंतर शिल्पाचं वजन खूप वाढलं होतं. पण योगाभ्यास आणि एक्सरसाईजच्या मदतीने तिने 100 दिवसात 32 किलो वजन कमी केलं होतं. याचा खुलासा सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर विनोद चन्नाने केला होता. शिल्पाला आष्टांग योगसन करणे अधिक पसंत आहे.
मलायका आरोरा
मलायका अरोरा ही तिच्या कामापेक्षा तिच्या फिटनेसमुळे अधिक चर्चेत असते. ती सतत सोशल मीडियात तिचे फिटनेस व्हिडिओ शेअर करत असते. फिटनेससाठी मलायका अनेक वर्षांपासून योगाभ्यास करते. तसेच तिचं एक योगा सेंटरही आहे. ती तिथे लोकांना योगा शिकवते. मलायका वेगवेगळ्या प्रकारचा योगाभ्यास करुन स्वत:ला फिट ठेवते.
जॅकलिन फर्नांडिस
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन रोज जिम जाण्याआधी एक तास योगासने करते. या रूटीनमध्ये ती 108 वेळ सूर्यनमस्कार करते. त्याचप्रमाणे ती नियमितपणे आष्टांग योग करते. योगभ्यासाचा जॅकलिनला किती फायदा होतो हे तिच्या इन्स्टाग्रामवरील व्हि़डीओवरुन बघता येतं.
करिना कपूर
आपल्या झिरो फिगरसाठी प्रसिद्ध असलेली करिना कपूरही नियमित योगाभ्यास करते. करिना रोज पावर आणि विक्रम योग करते. त्यासोबतच ती 50 सूर्यनमस्कार करते. प्रेग्नन्सीनंतर पुन्हा आपल्या झिरो फिगरमध्ये येण्यासाठी करिनाला योगाभ्यासाची फार मदत झाली.
अनिल कपूर
62 वर्षीय अनिल कपूर आजही तरुणांना लाजवतील इतके फिट आहेत. त्यांच्या फिटनेस रूटीनमध्ये अनेक वर्षांपासून हॉट योगाभ्यासाचा समावेश आहे. हा योगाभ्यास 50 डिग्री तापमानात केला जातो.
बिपाशा बसु
फिटनेस आयकॉन बिपाशा बसु अनेक वर्षांपासून योगाभ्यास करत आहे. वर्कआऊटबाबत वेगवेगळे प्रयोग करणारी बिपाशाने फिटनेस सीडीही लॉन्च केली आहे. बिपाशा रोज 108 सूर्यनमस्कार करते. त्यासोबतच कॉम्बिनेशन योगाभ्यासही करते. हे कार्डियो आणि योगाभ्यासाचं कॉम्बिनेशन आहे.
नरगिस फखरी
नरगिस ही फिटनेससाठी डान्स आणि योगाभ्यास करते. ती रोज अॅक्वा योगाभ्यास करते. भारतात आल्यावर तिने योगाभ्यास करायला सुरुवात केली होती.