शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

International Yoga Day 2018 : ही पाच आसनं करा आणि चिरतरुण राहा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 1:09 PM

दैनंदिन जीवनातील अनैसर्गिक प्रक्रियांमुळे अकाली किंवा लवकर वृद्धत्व येते.

मुंबई - सदैव चिरतरुण राहावं, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण वृद्धापकाळ हा आयुष्याचाच एक भाग असतो आणि आयुष्यातील या टप्प्याकडे ठरवूनही आपण दुर्लक्ष करू शकत नाही. मात्र अकाली येणाऱ्या वृद्धत्वाचा सामना करणं अत्यंत क्लेशदायक असते. दैनंदिन जीवनातील अनैसर्गिक प्रक्रियांमुळे अकाली किंवा लवकर वृद्धत्व येते. जीवनशैली, शारीरिक समस्या, नैराश्य, ताणतणाव इत्यादी कारणांमुळे या समस्या उद्धभवतात.  सुरकुत्या येणे, त्वचा सैल होणे, त्वचा कोरडी होणे आणि संवेदनशील त्वचा ही अकाली वृद्धत्वाची लक्षणं आहेत. अकाली वृद्धत्वाची समस्या समूळ नष्ट करावयाची असल्यास योगसाधनेचा मार्ग अवलंबावा. नियमित योगाभ्यास केल्यास केवळ अकाली वृद्धत्वच नाही तर अन्य शारीरिक व मानसिक आरोग्यदेखील सुधारण्यास मदत होते. 

अकाली वृद्धत्वाची समस्या टाळण्यासाठी खालील दिलेल्या पाच योगाभ्यांसाचा अभ्यास करावा1. सिंह मुद्रा  (Lion Pose)ताणतणामुळे अनेकदा अतिरिक्त रक्तदाब (High Blood Pressuer ) किंवा अल्प रक्तदाब (Low Blood Pressuer ) हे दोष निर्माण होतात.  संतुलित रक्तदाब निर्माण करण्यास कॅरोटाइड बॉडी, सायनस नर्व्हज् व व्हेगस नर्व्ह यांची फार मदत होते. यामुळे सिंह मुद्रेचा नियमित अभ्यास केल्यास  कॅरोटाइड बॉडी, सायनस नर्व्हज् व व्हेगस नर्व्ह, थायरॉइड व पॅराथायरॉइड एन्डोक्रिनल ग्लँड्स यांचे स्वास्थ चांगले राहते. चेहऱ्याचा फुगीरपणा व फिकेपणा तसंच चेहऱ्याच्या त्वचेचा रुक्षपणा या मुद्रेच्या दीर्घ अभ्यासानं नाहीसा होतो.संकेत - जबड्यातील वेदना, सूज असल्यास सिंह मुद्रेचा अभ्यास करू नये.

International Yoga Day 2018 : वजन आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी खास 5 योगासने!

2. मत्स्यासन (Fish Pose)मत्स्यासनाचा नियमित अभ्यास केल्यास हनुवटीखालील ताणरहित स्नायूंची अतिरिक्त वाढ (Double Chin) नाहीशी होते. छातीचे स्नायू ताण मिळाल्यामुळे अधिक लवचिक बनतात व छातीचा पिंजरा अधिक कार्यक्षम बनतो. यामुळे श्वसनक्षमता वाढते.  मानेचे स्नायू सुदृढ व गळ्याचे स्नायूचे लवचिक बनतात. मानदुखीची समस्यादेखील कमी होते.संकेत - मानेचे कोणत्याही प्रकारचे दोष, गळ्यामध्ये सूज असल्यास मत्स्यासन करणं टाळावे.   

3. हस्तपादासन (Standing Forward Bend)तरुण राहण्यासाठी मदत करणाऱ्या आसनांमध्ये हस्तपादासनाचाही समावेश आहे. पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते. पाठीच्या कण्यावरील ताणामुळे कण्यातील किरकोळ दोष नाहीसे होतात. तेथील रक्ताभिसरण सुधारते. पोटावर विशेषतः ओटीपोटावर धन दाब (Positive Pressure ) निर्माण झाल्यानं तेथील चरबी कमी होते. संकेत - तीव्र पाठदुखी, कंबरदुखी असल्यास हस्तपादासनाचा अभ्यास करणं टाळावं. 

4. वीरभद्रासन (Warrior Pose)वीरभद्रासनामुळे छाती, फुफ्फुसे, खांदे, मान, पोट आणि मांड्यांवर ताण येतो. यामुळे खांदे, पाठ आणि पायांचे स्नायू मजबूत होतात.  

5. ब्रह्ममुद्रा रक्तदाब व हृदयस्पंदन नियंत्रित करण्यास मदत करणारे कॅरोटाइड बॉडी, सायनस नर्व्हज् व व्हेगस नर्व्ह ही अंग तसंच व्यक्तिमत्त्वावर बरा-वाईट परिणाम करणाऱ्या कंठग्रंथी (Thyroid and Parathyroid Endocrine Glands), स्वरयंत्र इत्यादी महत्त्वांची अंगे आहेत. ब्रह्ममुद्रेचा अभ्यास केल्यानं या भागांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.  यामुळे मान दृढ व लवचिक होते. मान व गळा यांतील रक्तसंचय नष्ट होतो. संकेत - मानेचे गंभीर आजार, ताठर मान असल्यास ब्रह्ममुद्रेचा अभ्यास करू नये.  

टॅग्स :YogaयोगHealthआरोग्य