International Yoga Day 2018 : वजन आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी खास 5 योगासने!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 11:53 AM2018-06-20T11:53:39+5:302018-06-20T11:53:39+5:30

आम्ही तुम्हाला अशी काही योगासने सांगणार आहोत ज्यांच्या माध्यमातून तुम्ही वजन कमी करु शकता. पण ही सर्व आसने तज्ज्ञांच्या सल्ल्याने करणे आवश्यक आहेत. 

International Yoga Day 2018 : Special Yoga for reducing weight and fat in the stomach! | International Yoga Day 2018 : वजन आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी खास 5 योगासने!

International Yoga Day 2018 : वजन आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी खास 5 योगासने!

googlenewsNext

बदलत्या लाइफस्टाईलमुळे, बदलत्या खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे अनेकांना वाढत्या वजनाची चिंता भेडसावते आहे. अनेक उपाय करुनही, डाएट करुनही त्यांना वजन कमी करण्यात यश मिळत नाहीये. पण वजन कमी करणे तसे सोपेही नाहीये. पण आम्ही तुम्हाला अशी काही योगासने सांगणार आहोत ज्यांच्या माध्यमातून तुम्ही वजन कमी करु शकता. पण ही सर्व आसने तज्ज्ञांच्या सल्ल्याने करणे आवश्यक आहेत. 

1) भुजंगासन

(Image Credit : YouTube)

भुजंगासन हे पोटातील चरबी कमी करण्यासोबतच खांदे, कंबर आणि पोटच्या मांसपेशी मजबूत करण्यासाठी फायद्याचं आहे. सोबतच या आसनामुळे शरीर लवचिक होण्यासही मदत मिळते. 

हे आसन करण्यासाठी पोटावर झोपावे. हनुवटी जमिनीवर टेकवावी. दोन्ही हात सरळ मांड्यांजवळ ठेवून तळवे पूर्णपणे जमिनीवर टेकलेले ठेवावेत. पायांचे अंगठे व टाचा एकमेकांना चिकटून ठेवावे, पण चवडे मागे ताणून ठेवावेत. दोन्ही हात छातीशेजारी टेकवावेत. हातांची कोपरे आकाशाच्या दिशेने ठेवा. कपाळ टेका, श्‍वास सोडा व श्‍वास घेत प्रथम कपाळ व हनुवटी वर उचला. मान मागच्या दिशेने वाकवत खांदे, छाती हळूहळू वर उचला. हात कोपरात सरळ होईपर्यंत वर घ्या. श्‍वसन संथपणे सुरू ठेवा. आसन सोडताना श्‍वास सोडत सावकाळ पूर्ववत स्थितीत या.

2) हस्तपादासन

वजन कमी करण्यासाठी हस्तपादासन फार चांगला पर्याय आहे. हे आसन वजन कमी करण्यासोबतच पाठीचा कणा मजबूत करतो. या आसनामुळे शरीराच्या वेगवेगळ्या अंगावर ताण पडतो आणि यामुळे शरीराची लवचिकताही वाढते. 

हे आसन करण्यासाठी आधी सरळ उभे रहावे. दोन्ही पायांमध्ये योग्य अंतर ठेवावे. नंतर हात वर करुन कमरेतून क्षमतेनुसार मागे झुकावे. हनुवटी वरच्या बाजूला ठेवावी. नंतर गुडघे ताठ ठेवून हळूहळू कमरेपासून पुढे यावे. दोन्ही हात खाली जमिनीवर ठेकवण्याचा प्रयत्न करावा. काही सेकंद असेच रहावे. आणि त्यानंतर हळूहळू पूर्व स्थितीत यावे. 

3) शशांकासन 

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आणि मांसपेशी मजबूत करण्यासाठी हे आसन उपयोगी आहे. हे आसन करताना शरीराचा पूर्ण भार हा गुडघ्यांवर द्यावा आणि मोठा श्वास घेऊन पुढच्या बाजून झुकावे. हे करताना छाती ही मांड्यावर टेकली गेली पाहिजे आणि कपाळ जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करायला हवा. काही सेकंद या स्थितीत रहावे आणि श्वास सोडत पूर्व स्थितीत यावे.  

4) पश्चिमोत्तानासन

पश्चिमोत्तानासन हे सुद्धा वजन कमी करण्यासाठी उपयुक्त प्रभावी आसन आहे. दोन्ही पाय समोर उघडून बसावे. पायांचे अंगठे व टाचा जुळवून ठेवावे. दोन्ही हात कंबरेच्या दोन्ही बाजूस ठेवावे. दोन्ही हात कंबरेच्या दोन्ही बाजूस ठेवावे. मान सरळ व नजर समोर असावी. थोडे समोर वाकून हनुवटी जमिनीला समांतर ठेवून कंबरेतून वाकून डाव्या हाताने डाव्या हाताचा अंगठा पकडावा. आणि उजव्या हाताने उजव्या हाताचा अंगठा पकडावा.

श्वास सोडत आणखी पुढे वाकून कपाळ गुडघ्यावर वाकवू नये किंवा गुडघे वर उचलून कपाळ गुडघ्याला लावू नये किंवा हिसके देऊन कपाळ गुडघ्यास लावण्याचा प्रयत्न करू नये. अंगठे पकडता आले नाहीत तर घोटे पकडून शक्य तेवढे पुढे वाकावे. कोपरे जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करावा. थोडा वेळ त्याच स्थितीत राहावे. हळू हळू हाताची पकड सोडून पूर्वस्थितीत यावे.

5) धनुरासन

(Image Credit: www.stylecraze.com)

पोटाचे पाठीचे व तत्संबंधी विकार असणाऱ्यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय व मार्गदर्शनाशिवाय हे आसन करू नये. हे आसन करताना जमिनीवर पालथे झोपा. गुढघ्यात पाय दुमडून टाचा वर ठेवा. गुडघे व पंजे एकमेकांना जोडलेले असावेत. दोन्ही हातांनी पायांच्या गुडघ्याजवळ पकडा. श्वास आत घेऊन गुढघे व मांड्यांना उचलत वरच्या बाजूला ताणा. हात सरळ असू द्या. मागचा भाग उचलल्यानंतर पोटाचा वरील भाग छाती, मान व डोकेसुद्धा वर उचला. नाभी व पोटाच्या खालचा भाग जमिनीवरच असू द्या. शरीराची आकृती प्रत्यंचा ताणलेल्या धनुष्यासारखी होईल. अशा स्थितीत १० ते ३० सेकंद रहा. श्वास सोडताना क्रमशः पूर्व स्थितीत या. श्वासोश्वास सामान्य झाल्यावर पुन्हा करा.

Web Title: International Yoga Day 2018 : Special Yoga for reducing weight and fat in the stomach!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.