तांदळातील 'हा' घटक असतो धोकादायक, जाणून घ्या भात शिजवण्याची योग्य पद्धत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 16:53 IST2021-06-16T16:52:39+5:302021-06-16T16:53:56+5:30
भात जर योग्य पद्धतीने शिजवला गेला नाही तर त्यातील विषारी द्रव्ये तशीच राहतात आणि त्याचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जाणून घेऊया भात शिजवण्याची योग्य पद्धती.

तांदळातील 'हा' घटक असतो धोकादायक, जाणून घ्या भात शिजवण्याची योग्य पद्धत
अनेकांना जेवताना भात लागतोच लागतो. किनारपट्टीवरील लोकांच तर भात हे आवडतं अन्न आहे. मात्र तुम्हाला माहितही नसेल तुमच्या घरात भात झिजवण्याची पद्धत चूकत असेल. ती अशासाठी की भात जर योग्य पद्धतीने शिजवला गेला नाही तर त्यातील विषारी द्रव्ये तशीच राहतात आणि त्याचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जाणून घेऊया भात शिजवण्याची योग्य पद्धती.
भात योग्य पद्धतीने न शिजवल्याचे दुष्परिणाम
सायन्स ऑफ द टोटल एनर्वोमेंट येथील संशोधनानुसार भातामध्ये अर्सेनिक नावाचा घटक असतो जो आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक असतो. सफेद तांदळात ७४ टक्के अर्सेनिक असते जे खाली दिलेल्या विशिष्ट पद्धतीने तांदूळ शिजवल्यास बाहेर पडते.
जर हे बाहेर काढले नाही तर खालील दुष्परिणाम होऊ शकतात.
त्वचेच्या समस्या
कॅन्सरचा धोका
डायबेटीस
फुफ्फुसाचे रोग
भात शिजवण्याची पद्धत
१.प्रथम एक वाटी तांदूळ घ्या
२.त्यात चार वाटी पाणी टाका
३.हे पाणी व्यवस्थित उकळून घ्या
४.ते गाळून टाका
५.त्यात पुन्हा दोन वाट्या पाणी टाका आणि नीट शिजवा
याचे फायदे
अशा पद्धतीने भात शिजवल्यामुळे तुम्ही भातातून सर्व विषारी द्रव्ये बाहेर फेकता
डायबेटीस आणि लठ्ठपणाची समस्या दुर ठेवतो
लहान मुलांना अर्सेनिकच्या धोक्यापासून दूर ठेवतो
भात कमी वेळात शिजतो