लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशातील क्षयरुग्णांची संख्या पाहता भारताला टीबीमुक्त करण्याचे स्वप्न यंदा पूर्ण होणे सहज शक्य नसल्याचे दिसून येत आहे. कोरोनानंतर प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे टीबीच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, कोरोनानंतर टीबीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. जागरूकतेचा अभाव, योग्य आहार न मिळणे, स्वच्छतेचा अभाव, कमकुवत प्रतिकारशक्ती, अमली पदार्थांचे व्यसन, कुपोषण, योग्य उपचार न घेणे आदी कारणेही टीबीचे रुग्ण वाढण्याची प्रमुख कारणे आहेत.
सर्वाधिक प्रकरणे कुठे?
- बिहार - १,६७,१९३
- मध्य प्रदेश - १,४९,०९३
- राजस्थान- १,४५,४०५
- गुजरात- १,१३,४३१
- दिल्ली- ८८,८६८
- पश्चिम बंगाल- ८३,९६२
- तामिळनाडू- ७७,८२०
- हरयाणा- ७३,७०३
(ऑक्टोबर २०२४ पर्यंतची आकडेवारी)
...मग चाचणी करा
- बराच वेळ सतत ताप येणे.
- सतत खोकल्याची समस्या.
- थुंकीत रक्तस्त्राव.
- रात्री घाम येणे.
- शरीराच्या विविध भागांमध्ये गुठळ्या.
- श्वास घेण्यास त्रास होणे.
- सतत छातीत दुखणे.
- सतत थकवा, भूक न लागणे.
सहा राज्यांमध्ये एक लाखांहून अधिक रुग्ण
देशातील सहा राज्ये अशी आहे तिथे क्षयरोगाचे एक लाखाहून अधिक रुग्ण आहेत. उत्तर प्रदेशात सर्वाधिक ५ लाख ६३ हजार ५७३, महाराष्ट्रात १ लाख ८६ हजार ७०६, बिहारमध्ये १ लाख ६७ हजार १९३ रुग्ण आढळले आहेत.
देशात टीबी रुग्ण किती? (जानेवारी ते डिसेंबर)
- २०२० १८,०५,६७०
- २०२१ २१,३५,८३०
- २०२२ २४,२२,१२१
- २०२३ २५,५२,२५७
- २०२४ २३,९४,२९२