सर्वसाधारपणे १० ते १२ वर्षांची मुलं जर कुकिंग शोज पाहत असतील तर त्यांचासाठी फायद्याचं ठरणार आहे. खासकरून असे मेजवानीचे कार्यक्रम ज्या कार्यक्रमात हेल्दी फूड्सला जास्त प्राधान्य दिलं जातं. कारण तुमची मुलं पोष्टीक आणि हेल्दी फूडचे कुकिंग शोज् पाहत असतील तर आपोआपच ते अनहेल्दी खाणं सोडून देतील. जर्नल ऑफ न्यूट्रिशन एजुकेशन अॅँण्ड बिहेवियर या पुस्तकात हा रिसर्च प्रकाशित करण्यात आला आहे.
या संशोधनासाठी नेदरलँण्डच्या पाच शाळांमधील १२५ मुलांना कुकिंग शोज् दाखवण्यात आले.यात १० ते १२ वर्षाच्या मुलांचा समावेश होता. या मुलांना दोन भागांमध्ये विभागण्यात आलं होतं.
तसंच या मुलांपैकी एका गटाला हेल्दी फूड खात असलेले तसंच अनहेल्दी फू़ड खात असलेले असे विभाजन करण्यात आले होते. या संशोधनातून असं दिसून आलं की हेल्दी फूडच्या कुकिंग रेसीपीज पाहत असलेल्या मुलांनी स्नॅ्क्स आणि अनहेल्दी खाण्याचं प्रमाण कमी केलं होतं.
या संशोधकांनी असा सल्ला दिला की या मुलांना शालेय शिक्षणासोबतच अश्याप्रकारंच शिक्षण आणि कुकिंग शोज दाखवणे गरजेचं आहे. या रिसर्चमध्ये असं दिसून आलं की जी मुलं खाण्यापिण्याच्या बाबतीत काही नवीन ट्राय करण्यासाठी घाबरत होती. ती सकारात्मक झाली होती.
त्यामुलांमधील भीती कमी झालेली दिसून आली. तसंच त्यांना नवीन आणि पौष्टीक खाण्यासाठी फोर्स करण्याची काही गरज उरली नव्हती. या संधोधनातून समोर आलेल्या गोष्टींना अनूसरून पुढिल संशोधन करण्यात येत आहे.