कोरोनाकाळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर 'या' पदार्थापासून सावधान!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 02:48 PM2021-06-13T14:48:13+5:302021-06-13T14:48:53+5:30

सध्याच्या कोरोनाकाळात जो तो रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर देतोय. त्यासाठी करावे लागणारे सर्व उपाय आपण सर्वजण करत असाल. पण तुम्हाला माहित आहे का की असे काही पदार्थ आहेत जे खाल्ल्यामुळे तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो.

If you want to boost the immune system during the coronary period, beware of 'this' substance! | कोरोनाकाळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर 'या' पदार्थापासून सावधान!

कोरोनाकाळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर 'या' पदार्थापासून सावधान!

Next

सध्याच्या कोरोनाकाळात जो तो रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर देतोय. त्यासाठी करावे लागणारे सर्व उपाय आपण सर्वजण करत असाल. पण तुम्हाला माहित आहे का की असे काही पदार्थ आहेत जे खाल्ल्यामुळे तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. हा पदार्थ म्हणजे मीठ. हो तुम्ही बरोबर एकताय...
जेवणात मीठाचं प्रमाण कमी असलं तर अन्न बेचव लागतं. मीठाचं महत्व जेवणाची चव वाढवण इतपतच मर्यादित नसून आरोग्यासाठी देखील काही प्रमाणात फायदेशीर मानलं जातं. मीठाच्या माध्यमातून आवश्यक असलेले सोडियम तसेच क्लोराइड आपल्या शरीराला मिळतं. मीठाचे फायदे जरी अगणित असले तरी अधिक मीठाचं सेवन ब्लड प्रेशर सारख्या समस्यांना निमंत्रण देतं. तर एका अभ्यासाच्या माध्यमातून मीठाचं अतिसेवन इम्युनिटीसाठी धोकादायक ठरू शकतं असं समोर आलं आहे.
सायन्स ट्रान्सलेशन मेडिसीनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, जर्मनीतील यूनिवर्सिटी हॉस्पिटल ऑफ बोनच्या संशोधकांनी एक अभ्यास केला. या अभ्यासातून असं लक्षात आलं की, आपल्या आहारात अधिक मीठाचा समावेश केल्याने रोगप्रतिकारक शक्ती तसेच सेल्सचं अॅन्टी बॅक्टेरियल फंक्शन बिघडू शकतं. ज्यामुळे इम्यून सिस्टीम धोकादायक बॅक्टेरियाला नष्ट नाही करू शकत.
संशोधकांच्या टीमने हा अभ्यास उंदरांवर केला. ज्यासाठी उंदरांना लिस्टीरिया बॅक्टेरियाने संक्रमित केलं. यानंतर ज्या उंदरांना अधिक मीठ असलेला आहार देण्यात आला होता त्यांची परिस्थिती गंभीर झाली होती. जास्त मीठाचं सेवन केल्याने न्यूट्रोफिल नावाच्या रोगप्रतिकारक पेशी कमकुवत होऊ शकतात. जे बॅक्टेरीयल किडनी इन्फेक्शनपासून लढण्यास मदत करतात.

Web Title: If you want to boost the immune system during the coronary period, beware of 'this' substance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.