विराट कोहली केवळ क्रिकेटमध्येच नाही तर फिटनेसमध्येही नंबर वन!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 07:09 PM2019-01-22T19:09:30+5:302019-01-22T19:12:06+5:30

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीने आयसीसी अवॉर्ड्स 2018 (ICC Awards 2018) मध्ये हॅट-ट्रिक लगावली आहे. आयसीसीने विराटला 2018-2019मध्ये तीन मोठे अ‍ॅवॉर्ड्स देण्याची घोषणा केली आहे.

Icc award 2018 winner virat kohli diet fitness and workout plan | विराट कोहली केवळ क्रिकेटमध्येच नाही तर फिटनेसमध्येही नंबर वन!

विराट कोहली केवळ क्रिकेटमध्येच नाही तर फिटनेसमध्येही नंबर वन!

googlenewsNext

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीने आयसीसी अवॉर्ड्स 2018 (ICC Awards 2018) मध्ये हॅट-ट्रिक लगावली आहे. आयसीसीने विराटला 2018-2019मध्ये तीन मोठे अ‍ॅवॉर्ड्स देण्याची घोषणा केली आहे. कोहलीला पहिल्यांदाच 'टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर' म्हणून घोषित करण्यात आलं आहे. त्याचबरोबर सलग दुसऱ्या वर्षी 'वन डे क्रिकेटर ऑफ द इयर'चा सन्मान मिळाला. याव्यतिरिक्त कोहलीने आयसीसी 'मेन्स क्रिकेटर ऑफ द इयर'चा मानही पटकावला आहे. तीन अ‍ॅवॉर्ड्सव्यतिरिक्त कोहलीला आयसीसी टेस्ट आणि वनडे टीम ऑफ द इयरचं कॅप्टनही बनवण्यात आलं आहे. 

विराट कोहली क्रिकेटमध्ये अव्वल असण्यासोबतच फिटनेसमध्येही नंबर वन आहे. क्रिकेट विश्वातील सर्वात फिट खेळांडूंपैकी एक म्हणजे, विराट कोहली. विराट प्रमाणे आपणही फिट असावं असं प्रत्येक मुलांच स्वप्न असतं. पण हे अजिबातच सोपं काम नाही बरं का? यासाठी स्ट्रिक्ट फिटनेस गरजेचं असतं. विराट आपलं फिटनेस मेंटेन ठेवण्यासाठी स्ट्रिक्ट डाएटसोबत स्ट्रिक्ट फिटनेस रूटीनही फॉलो करतात. जाणून घेऊया काय आहे विराटच्या या फिटनेसचं सिक्रेट...


विराटचा वर्कआउट प्लॅन 

कठिण परिश्रम, शिस्त आणि निर्धार या तीन गोष्टींमुळेच विराट प्रत्येक बाबतीत यश संपादन करतो. विराट या तीन गोष्टींचं काटेकोरपणे पालन करतो. त्यामुळे एक उत्तम खेळाडू असण्यासोबतच तो फिटनेस फ्रिकही आहे. विराट आठवड्यातून पाच दिवस जिममध्ये दोन तासांसाठी वर्कआउट करतो. जेव्हा तो एखाद्या क्रिकेट टूरवर असतो. त्यावेळीही तो आपल्या वर्कआउटमध्ये खंड पडू देत नाही. त्याच्या वर्कआउट प्लॅनमध्ये कार्डियो आणि वेट एक्सरसाइजचा समावेश असतो. याशिवाय विराट टेक्नोशेपरचाही उपयोग करतो. त्यामुळे पोटाच्या आजूबाजूचा लठ्ठपणा कमी होतो. 

विराटचा डाइट प्लान

विराटच्या डाएटमध्ये ग्लूटेन आणि धान्यांचा जास्तीत जास्त समावेश असतो. मिठाई आणि कोल्ड ड्रिंकपासून विराट नेहमीच दूर राहतो. त्याच्या नाश्त्यामध्ये ऑमलेट, तीन एग व्हाइट, एक पूर्ण अंड, पालक, चीज याव्यतिरिक्त स्मोक्ड सॅल्मनचा समावेश असतो. याव्यतिरिक्त पपई, टरबूज किंवा ड्रॅगन फ्रुटचाही समावेश असतो. चांगल्या फॅट्ससाठी पनीर आणि अक्रोडचा समावेश विराट डाएटमध्ये करतो. त्यानंतर ग्रीन टी घेतो. लंच आणि डिनरमध्ये ग्रील्ड चिकन आणि ग्रील्ड फिशचा समावेश करतो. विराट शक्य तेवढा जंक फूड आणि कॉफीपासून लांब राहतो. 

Web Title: Icc award 2018 winner virat kohli diet fitness and workout plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.