Hypertension: २१ कोटींपेक्षा जास्त भारतीयांना उच्च रक्तदाबाने ग्रासले; महाराष्ट्रातील परिस्थिती काय? WHOने दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 16:10 IST2025-09-26T15:55:16+5:302025-09-26T16:10:25+5:30
Hypertension in Marathi: भारतात हायपरटेन्शन अर्थात उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, जागतिक आरोग्य संघटनेने याबद्दल सावधगिरीचा इशारा दिला आहे.

Hypertension: २१ कोटींपेक्षा जास्त भारतीयांना उच्च रक्तदाबाने ग्रासले; महाराष्ट्रातील परिस्थिती काय? WHOने दिला इशारा
भारतामध्ये उच्च रक्तदाब मोठी समस्या बनली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या नव्या रिपोर्टनुसार, भारतात २१ कोटींपेक्षा जास्त लोक उच्च रक्तदाबाने त्रस्त आहे. ३० ते ७९ वयोगटातील लोक उच्च रक्तदाबाने ग्रासले गेले असून, याचे प्रमाणे एकूण लोकसंख्येपैकी ३० टक्के इतके आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ग्लोबल रिपोर्ट ऑन हायपरटेन्शन २०२५ असा रिपोर्ट जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केला आहे. रिपोर्टनुसार देशातील फक्त ८.२२ टक्के लोकांनाच माहिती आहे की, त्यांना हा आजार आहे. १७.३ कोटी म्हणजे ८३ टक्के लोकांचा रक्तदाब नियंत्रणात नाहीये. फक्त १७ टक्के लोकांचाच रक्तदाब नियंत्रणात आहे.
उच्च रक्तदाब का आहे जीवघेणा?
उच्च रक्तदाबाचा परिणाम थेट ह्रदय आणि मेंदूवर होतो. जास्तीचा दबाव टाकला जातो. वेळीच तो नियंत्रणात आणला गेला नाही, तर ह्रदयविकाराचा झटका, किडनी निकामी होणे, डोळ्यांच्या त्रास किंवा स्मृतिभ्रंश हे आजार होऊ शकतात.
महाराष्ट्रात काय आहे स्थिती?
भारतात या आजारावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न यशस्वी ठरताना दिसत आहेत. २०१८-१९ पासून शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत जेनेरिक औषधी दिली जात आहेत. याच्या औषधींच्या किंमतीवरही निर्बंध घालण्यात आलेली आहेत. खासगी मेडिकल स्टोअरच्या तुलनेत ८० टक्के स्वस्त औषधी सरकारी रुग्णालयात मिळतात.
आधी १४ टक्के रुग्णांचा उच्च रक्तदाब नियंत्रणात होता. आता परिस्थिती बदलली आहे. महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये ७०-८१ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. सरासरी सिस्टोलिक बीपी १५-१६mmHg कमी झाला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे म्हटले आहे की, उच्च रक्तदाब हा आजार देशातील आरोग्य योजनांमध्ये समावेश करावा. योग्य पावले उचलली गेली, तर लाखो मृत्यू टाळता येतील आणि आर्थिक ताणही कमी होईल.