कानात चिकटून बसलेला मळ बाहेर कसा काढाल? जाणून घ्या सोपे घरगुती उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 11:12 IST2024-10-30T11:11:39+5:302024-10-30T11:12:31+5:30
Home Remedies To Get Rid of Ear Wax: कान सतत खाजवतो, कानात वेदना होते आणि इन्फेक्शनही होतं. बरेच लोक ईअर बडचा वापर करतात. पण त्याने नुकसानही होतं.

कानात चिकटून बसलेला मळ बाहेर कसा काढाल? जाणून घ्या सोपे घरगुती उपाय!
Home Remedies To Get Rid of Ear Wax: कानात मळ होणं ही एक सामान्य समस्या आहे. कोणत्याही वयातील व्यक्तीला ही समस्या होऊ शकते. धूळ, प्रदूषण, तेल आणि डेड स्किनमुळे कानात मळ जमा होतो. नियमितपणे कान साफ केले नाही तर हा मळ कठोर होतात. अशात कान सतत खाजवतो, कानात वेदना होते आणि इन्फेक्शनही होतं. बरेच लोक ईअर बडचा वापर करतात. पण त्याने नुकसानही होतं. अशात आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत.
१) गरम पाणी आणि कापडाचा वापर
गरम पाणी कान साफ करण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय आहे. एका ग्लासमध्ये गरम पाणी घ्या आणि त्यात एक कापड भिजवा. कापड पिळून हळुवारपणे कानाच्या बाहेरचा भाग पुसून घ्या. कानात पाणी जाऊ देऊ नका. याने कानाच्या बाहेरील भागात असलेला मळ साफ होण्यास मदत मिळेल.
२) ऑलिव्ह ऑईल
ऑलिव्ह ऑईल कानातील मळ नरम करणे आणि बाहेर काढण्याचा एक नॅचरल उपाय आहे. याने कानाच्या आतील सूजही कमी होते. यासाठी या तेलाचे काही थेंब कानात टाका आणि डोकं काही वेळासाठी एका बाजूला झुकवा. जेणेकरून तेल कानात आतपर्यंत जाईल. ५ ते १० मिनिटांनी कान हळुवारपणे पुसून घ्या. याने कानातील मळ बाहेर येईल.
३) खोबऱ्याचं तेल
खोबऱ्याचं तेलही एक चांगला पर्याय आहे. खासकरून जर कान खाजवत असेल किंवा जळजळ होत असेल. तेलाचे काही थेंब हलकं गरम करून कानात टाका. काही वेळासाठी डोकं एका बाजूला झुकवा. याने कानातील चिकटून बसलेला मळ मोकळा होईल आणि बाहेर येईल.
४) मिठाचं पाणी
मिठाचं पाणी कानाची सफाई करण्यासाठी एक सोपा आणि सुरक्षित उपाय मानला जातो. एक कप गरम पाण्यात अर्धा चमचा मीठ मिक्स करा. नंतर रूई मिठाच्या पाण्यात भिजवा आणि त्याने कानाच्या बाहेरील भागावर पाणी लावा. याने कानाच्या आतील मळ मोकळा होईल आणि बाहेर येईल.
नियमितपणे कानाची सफाई करणं गरजेचं असतं. पण योग्य पद्धत माहीत असली पाहिजे. वर सांगण्यात आलेले उपाय सोपे, प्रभावी आणि सुरक्षित आहेत. ज्यामुळे कानाची सफाई सोपी होते. जर कानात खूप जास्त मळ जमा झाला असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा.