बी १२ ची कमतरता आहे? पण शाकाहारी आहात मग 'हे' आहेत पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 15:34 IST2022-05-02T15:34:08+5:302022-05-02T15:34:18+5:30
तुम्ही शाकाहारी असाल तर व्हिटॅमिन बी १२ची कमतरता दुर करण्यासाठी काय करावे हे जाणून घ्या

बी १२ ची कमतरता आहे? पण शाकाहारी आहात मग 'हे' आहेत पर्याय
तुम्ही मांस अथवा मासे खात असाल तर तुम्हाला व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता जाणवणार नाही. पण तुम्ही शाकाहारी असाल तर व्हिटॅमिन १२ ची कमतरता कशी दुर कराल? व्हिटॅमिन बी च्या कमरतेमुळे अतिसार, अपचन अशा समस्या निर्माण होतात. तुम्ही शाकाहारी असाल तर व्हिटॅमिन बी १२ची कमतरता दुर करण्यासाठी काय करावे हे जाणून घ्या. डायटिशीयन नताशा मोहन यांनी याबाबतच्या टिप्स न्युज १८ हिंदीला दिल्या आहेत.
चणे
चणे हा प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे. यामध्ये फायबरही मोठ्या प्रमाणात असते. सर्वात मुख्य म्हणजे हा व्हिटॅमिन बी १२चाही चांगला स्त्रोत आहे.
मठ्ठा
दूध फाटल्यानंतर उरलेलं पाणी म्हणजेच मठ्ठा. हा मठ्ठाही प्रोटीनयुक्त असतो. व्हिटॅमिन बी १२ चा हा मोठा स्त्रोत आहे. त्यामुळे हा मठ्ठा फेकुन देण्याआधी विचार करा.
दही
दही हा प्रोबायोटीक्सचा उत्तम सोर्स आहे. पण तुम्हाला माहित आहे का की दही हा व्हिटॅमिन बी १२ चाही उत्तम सोर्स आहे. जर तुम्ही वेगन असाल तर टोफु, सोयामिल्क अशा पदार्थांचेही तुम्ही सेवन करु शकता.
बीट
बीट हे व्हिटॅमिन बी १२चा उत्तम सोर्स आहे. तसेच त्यात लोहही मुबलक प्रमाणात असते. जे रक्ताचे कार्य सुरळीत करते. त्यामुळे बीटाचे सेवन बी १२ ची कमतरता दूर करण्यात फायद्याचे ठरेल.