भय इथले संपत नाही! कोरोना आहे की व्हायरल? समजत नसेल तर 'या' लक्षणांवरून लगेचच ओळखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 17:14 IST2022-05-02T17:09:22+5:302022-05-02T17:14:57+5:30

कोरोनाचे रुग्णही झपाट्याने वाढत आहेत. अशा वेळी ताप आणि सर्दी खोकल्याने त्रस्त असलेल्या लोकांना कोरोना आहे की व्हायरल हे समजत नाही.

how to identify corona or viral fever covid 19 symptoms viral and flue symptoms | भय इथले संपत नाही! कोरोना आहे की व्हायरल? समजत नसेल तर 'या' लक्षणांवरून लगेचच ओळखा

भय इथले संपत नाही! कोरोना आहे की व्हायरल? समजत नसेल तर 'या' लक्षणांवरून लगेचच ओळखा

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा कोरोनाची भीती निर्माण झाली आहे. उन्हाळ्यात व्हायरल, फ्लू आणि कोरोना एकत्र पसरतात. अशा परिस्थितीत लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बहुतेकांना ताप, खोकला, सर्दी यांचा त्रास होतो. त्याचबरोबर कोरोनाचे रुग्णही झपाट्याने वाढत आहेत. अशा वेळी ताप आणि सर्दी खोकल्याने त्रस्त असलेल्या लोकांना कोरोना आहे की व्हायरल हे समजत नाही.

व्हायरलआणि कोरोना व्हायरसची लक्षणे खूप समान आहेत. त्यामुळे तुम्हाला अधिक सावध राहण्याची गरज आहे. जाणून घ्या व्हायरल आणि कोरोनाची लक्षणं नेमकी काय आहेत?

फ्लू आणि व्हायरलची लक्षणे

व्हायरल ताप आणि फ्लूची लक्षणे कोरोनासारखीच आहेत. कोरोना विषाणूच्या बहुतेक रुग्णांमध्ये सामान्य लक्षणे दिसत आहेत. यामुळेच नॉर्मल सीझनल ताप आणि व्हायरल होऊनही लोक अस्वस्थ होत आहेत. सामान्य फ्लू आणि व्हायरल असल्यास रुग्ण 5-6 दिवसांत बरे होतात. 

- ताप
- संपूर्ण शरीरात वेदना
- स्नायू दुखणं
- वारंवार खोकला येणं
- नाक बंद होणं
- नाक दुखणं
- डोकेदुखी

कोरोनाची लक्षणे

- भीती आणि ताप
- घसा खवखवणे आणि सर्दी
- झोपेत बोलणं
- ब्रेन फॉग 
- हायपोक्सिया
- त्वचेवर रॅशेस येणं
- चव न समजणं
- वास घेण्याची क्षमता कमी होणं
- श्वास घेण्यात अडचण आणि हार्ट रेट हाय होणं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टिप- ही माहिती आम्ही केवळ वाचक म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची शारीरिक स्थिती वेगळी असल्याने कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
 

Web Title: how to identify corona or viral fever covid 19 symptoms viral and flue symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.