केवळ लाल कांद्याने 'या' गंभीर आजारावर मिळवता येईल नियंत्रण, जाणून घ्या उपाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 10:55 IST2020-03-17T10:55:44+5:302020-03-17T10:55:55+5:30
लोकांना अस्थमावर काही घरगुती उपायही जाणून घ्यायचे असतात. अशात आज आम्ही तुम्हाला लाल कांद्याचा यात फायदा कसा होतो हे सांगणार आहोत.

केवळ लाल कांद्याने 'या' गंभीर आजारावर मिळवता येईल नियंत्रण, जाणून घ्या उपाय
अस्थमा एक अशी स्थिती आहे ज्यात व्यक्तीची श्वासनलिका आकुंचते आणि त्यावर सूज येते. अस्थमामुळे व्यक्तीला श्वास घेण्यास समस्या होते आणि त्यांना खोकला, अस्वस्थ आणि श्वास भरून येण्याची समस्या होते. पण हा अस्थमा आहाराच्या मदतीने नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. अनेकजण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात की, अस्थमामध्ये काय खावे आणि काय खाऊ नये.
लोकांना अस्थमावर काही घरगुती उपायही जाणून घ्यायचे असतात. अशात आज आम्ही तुम्हाला लाल कांद्याचा यात फायदा कसा होतो हे सांगणार आहोत. सामान्यपणे वेगवेगळ्या पदार्थांची चव वाढवण्यासाठी कांद्याचा वापर केला जातो. पण अनेकांना हे माहीत नसतं की, कांद्यात अनेक आजारांसोबत लढण्याची क्षमताही असते. अस्थमात लाल कांदा फार फायदेशीऱ ठरतो. चला जाणून घेऊ याचे फायदे...
लाल कांद्याचे गुण
लाल कांद्यात भरपूर प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट्स तत्व असतात. त्यात फ्लेवेनॉएड्स आणि एंथोसियानिंस हेही तत्व असतात. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, लाल कांद्यात जवळपास २५ प्रकारचे एंथोसियानिंस तत्व असतात. फ्लेवेनॉएड्सने युक्त असल्याने यात रक्ताला नैसर्गिक रूपाने पातळ करण्याचा गुण असतो. लाल कांद्यात फायटोकेमिकल्स सुद्धा असतं ज्याने इम्यून सिस्टीम मजबूत होतं.
लाल कांद्यात व्हिटॅमिन के, बी६ आणि सी भरपूर प्रमाणात असतं. तसेच यात फायबरचं प्रमाणही अधिक असतं. ज्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते. त्यासोबतच यात खनिज पदार्थ, फोलेट, थियामिन, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि मॅगनीज असतात.
अस्थमात लाल कांदा
अनेक रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे की, लाल कांद्यातील अनेक तत्वांमुळे जसे की, थिओसल्फेट, क्यूसरसेटिन आणि एंथोसियानिन सियानिडिन असतं. हे तत्व अॅंटी-ऑक्सिडेंटच्या रूपात असत आणि यानेच लाल कांदा अस्थमावर फायदेशीर ठरतो.
आज आम्ही तुम्हाला अस्थमा असल्यास लाल कांद्याच कसा वापर करायचा हे सांगणार आहोत. याने तुमचा अस्थमा बरा नाही होणार, पण आराम नक्कीच मिळेल.
कांदा वापरण्याची योग्य पद्धत
सर्वातआधी तर एका भांड्यात ब्राउन शुगर घ्या आणि ती विरघळवा. त्यात लाल कांदा कापून ठेवा. जेव्हा शुगर पूर्ण विरघळेल तेव्हा त्यात कांदा कापून टाका. आता या मिश्रणात पाणी टाका आणि उकडून घ्या. आता हे मिश्रण थंड होऊ द्या आणि त्यात नंतर लिंबू व मध टाका. हे मिश्रण एका भांड्यात काढून ठेवा.
कसे कराल सेवन
जर तुम्हाला अस्थमा असेल तर आणि त्यावर नियंत्रण मिळवायचं असेल तर लाल कांद्याचं हे मिश्रण रोज जेवणाआधी एक चमचा सेवन करावं. तुम्ही जेवणातही लाल कांद्याचा वापर करू शकता. जर तुम्हाला अस्थमाची समस्या असेल तर लाल कांद्याचा हा उपाय तुम्हाला मदत करू शकतो.