How often should you shower in the winter, There are many benefits to not taking a bath | अंघोळ करायला कंटाळा येतो? मग ही बातमी तुमच्यासाठीच! अंघोळ न केल्यानं शरीराला होतात 'असे' फायदे

अंघोळ करायला कंटाळा येतो? मग ही बातमी तुमच्यासाठीच! अंघोळ न केल्यानं शरीराला होतात 'असे' फायदे

असे काही लोक आहेत ज्यांना रोज अंघोळ करण्याची सवय असते. तर दुसरीकडे असे काही लोक आहेत. ज्यांना हिवाळ्याच्या वातावरणात अंघोळ करायची म्हटलं तर खूप जिवावर येतं. आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात अंघोळ करण्याचे फायदे सांगणार आहोत. हिवाळ्यात अंघोळ करायचा तुम्हालाही कंटाळा येत असेल तर आज आम्ही तुम्हाला  काही खास गोष्टी सांगणार आहोत. हेल्थ लाईनने आपल्या वेबसाईटवर याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

स्किन एक्सपर्ट्सनी दिलेल्या माहितीनुसार रोज अंघोळ केल्यानं त्वचेला नुकसान होऊ शकते. हिवाळ्याच्या दिवसात रोज अंघोळ केल्यानं त्वचेच्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. कारण त्यावेळी त्वचेला गरजेपेक्षा जास्त पोषणाची गरज असते. काही एक्सपर्ट्सनी दिलेल्या माहितीनुसार हिवाळ्यात अंघोळ करणं शरीरासाठी काही प्रमाणात हानीकारक ठरू शकतं. 

स्किन स्वतःला स्वच्छ ठेवते

अमेरिकेतील ड्रर्मेटॉलोजिस्ट डॉक्टर रनेला यांनी सांगितले की, ''लोक रोज अस्वच्छ किंवा घाणेरडेपणामुळे नाही तर समाजाच्या  दबावामुळे अंघोळ करतात. अनेक अभ्यासातून असं समोर आलं आहे की,  त्वचेमध्ये स्वतःला स्वच्छ ठेवण्याची क्षमता असते. जर तुम्ही रोज व्यायाम करत नसाल, घाम गाळत नसाल तर तुम्ही रोज अंघोळ करणं गरजेचं आहे. ''

रोज अंघोळ केल्यानं त्वचा कोरडी पडते

जर हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही गरम पाण्यानं जास्तवेळ अंघोळ करत असाल तर त्यामुळे नुकसानाचा सामना करावा लागू शकतो. तुमची त्वचा कोरडी पडते. कारण त्वचेतील नैसर्गिक तैलयुक्त पदार्थ निघून जातात.  हे नैसर्गिक तेलयुक्त पदार्थ त्वचेला सुरक्षित ठेवतात, म्हणून रोज १० मिनिटांपेक्षा जास्तवेळ अंघोळ करू नका

शरीरासाठी काही बॅक्टेरियाज फायदेशीर असतात

तुमची त्वचा चांगले बॅक्टेरिया तयार करून नेहमी  त्वचेला हेल्दी ठेवण्याचा प्रयत्न करते. जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतील साहाय्याक प्राध्यापक डॉक्टर सी बँडन मिशेल यांनी दिलेल्या माहितीनुसार अंघोळ केल्यानंतर त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते. यातून अनेकदा चांगले बॅक्टेरियाज निघून जातात. बॅक्टेरियाज इम्यून सिस्टीमला सपोर्ट करण्यासाठी चांगले मानले जातात. त्यासाठी हिवाळ्यात आठवड्यातून दोन किंवा तीनवेळा अंघोळ करणं गरजेचं आहे. 

नखांना नुकसान पोहोचतं

दररोज गरम पाण्याने आंघोळ केल्याने तुमच्या नखांचेही नुकसान होते. आंघोळीच्या वेळी, आपली नखं पाणी शोषून घेतात, नंतर मऊ होतात आणि तुटतात. त्यांचे नैसर्गिक तेल देखील बाहेर पडते ज्यामुळे ते कोरडे व कमकुवत होते.

पाणी वाया जाणं

आपण वैयक्तिक मतापेक्षा सगळ्यांचा विचार केल्यास तुम्हाला जाणवेल की,  दररोज आंघोळ केल्यामुळे पाण्याचा अपव्यय देखील होतो. एका अभ्यासानुसार, एखाद्या व्यक्तीच्या आंघोळीमध्ये दररोज 55 लिटर पाणी वाया जाते. जरी आपण शॉवर घेतला तरी ते पाण्याचा अपव्यय  होतो. मृत्यूचं कारण ठरू शकतं नाकातील केस कापणं; तुम्हीसुद्धा असंच करत असाल तर वेळीच सावध व्हा

रोगप्रतिकारकशक्तीवर परिणाम होतो

विज्ञानानुसार आपण या हंगामात दररोज आंघोळ केली तर प्रतिकारशक्ती देखील कमी होत आहे. जगभरातील तज्ञांचे मत आहे की हिवाळ्याच्या काळात दररोज आंघोळ करणं फायदेशीर ठरेल. पण एकापेक्षा जास्तवेळा आंघोळ केल्याने आपली त्वचा खराब होते. 'या' समस्यांवर रामबाण उपाय धण्याचे पाणी; रात्री भिजवून सकाळी प्याल तर आजारांपासून राहाल लांब  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: How often should you shower in the winter, There are many benefits to not taking a bath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.