एका दिवसात किती कॉफी प्यायला हवी?; जास्त प्यायल्याने होऊ शकतं शरीराचं मोठं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 16:12 IST2024-07-17T16:00:04+5:302024-07-17T16:12:28+5:30
अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही गरमागरम कॉफीने होते. पण कॉफीचं अतिसेवन तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.

एका दिवसात किती कॉफी प्यायला हवी?; जास्त प्यायल्याने होऊ शकतं शरीराचं मोठं नुकसान
अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही गरमागरम कॉफीने होते. पण कॉफीचं अतिसेवन तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. जास्त कॉफी प्यायल्याने चिंता, निद्रानाश, हाय ब्लड प्रेशर यासारख्या अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात.
कॉफीमध्ये कॅफीन नावाचा पदार्थ असतो जे मेंदूला सक्रिय करतो आणि एकाग्रता आणि ऊर्जा पातळी वाढवतो.एका दिवसात किती कॉफी पिणं हे किती चांगलं आहे? आणि जास्त कॉफी प्यायल्याने तुमच्या शरीराला कोणते नुकसान होऊ शकतात? याबाबत जाणून घेऊया...
कॉफी पिण्याचे जसे फायदे आहेत. तसेच काही तोटे देखील आहेत. दररोज ४०० मिलीग्रामपेक्षा जास्त कॅफिनचं सेवन करू नये असं म्हणतात. यामुळे काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
कॉफी पिण्याचे फायदे
मेंदूचं आरोग्य
अभ्यासातून असं दिसून आलं आहे की कॉफी पिण्याने मेंदूचं आरोग्य सुधारतं आणि अल्झायमर आणि पार्किन्सनसारख्या आजारांचा धोका कमी होतो.
मधुमेहाचा कमी धोका
काही अभ्यासातून असं दिसून आलं आहे की कॉफी प्यायल्याने टाइप २ मधुमेहाचा धोका कमी होतो.
वजन कमी करण्यास मदत
कॉफी चयापचय वाढवते आणि वजन कमी करण्यास मदत करते.
नैराश्याचा धोका कमी
काही अभ्यासातून असं दिसून आलं आहे की कॉफी प्यायल्याने नैराश्याचा धोका कमी होतो.
जास्त कॉफी पिण्याचे तोटे
- कॅफिन हे एक उत्तेजक आहे जे झोपेमध्ये व्यत्यय आणू शकतं.
- जास्त कॅफीन चिंता आणि अस्वस्थता वाढवू शकतं.
- जास्त कॉफीमुळे अपचन होऊ शकतं.
- कॅफिनमुळे हृदयाचे ठोके आणि ब्लड प्रेशर वाढू शकतं.
- गर्भवती महिलांनी कॉफी कमी प्यायली पाहिजे, यामुळे त्रास होऊ शकतो.
तज्ञांचा सल्ला
तज्ञांनी असं सुचवलं आहे की दररोज ४०० मिलीग्रामपेक्षा जास्त कॅफिनचं सेवन करू नये. हे जवळपास चार कप कॉफीच्या बरोबर आहे.