अमृतापेक्षा कमी नाही आल्याचं हे खास पाणी, वजन स्पीडनं होईल कमी; वाचा कसं बनवाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 13:30 IST2025-03-11T13:29:51+5:302025-03-11T13:30:23+5:30
Ginger Water : आल्याची खासियत म्हणजे याच्या मदतीनं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यास मदत मिळते. अशात वजन कमी करण्यासाठी याचा कसा वापर करावा हे आज जाणून घेऊ.

अमृतापेक्षा कमी नाही आल्याचं हे खास पाणी, वजन स्पीडनं होईल कमी; वाचा कसं बनवाल!
Ginger Water : आलं हे एक कंदमूळ असून याचा वापर रोज घराघरांमध्ये वेगवेगळ्या पदार्थांची आणि चहाची टेस्ट वाढवण्यासाठी केला जातो. आल्यानं पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच यातील अनेक औषधी गुणांमुळे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. वजन कमी करण्यासाठी देखील आलं खूप फायदेशीर असतं असं एक्सपर्ट वेळोवेळी सांगत असतात. आल्याची खासियत म्हणजे याच्या मदतीनं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यास मदत मिळते. अशात वजन कमी करण्यासाठी याचा कसा वापर करावा हे आज जाणून घेऊ.
डॉ. सलीम जैदी यांनी एका इन्स्टाग्राम व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं की, आपल्या रोज आहारात आल्याचा पाण्याचा समावेश असला पाहिजे. आल्याला नॅचरल मेडिसीन म्हटलं जातं. कारण यात वेगवेगळे पोषक तत्व असतात. पण याचं पाणी पिण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत असली पाहिजे. तीच जाणून घेऊ.
गॅस-ब्लोटिंग होईल दूर
बऱ्याच लोकांना काहीही खाल्लं की, पोटात गॅस, पोट फुगणे अशा समस्या होतात. याचा अर्थ पचन तंत्रात काहीतरी गडबड आहे. पचन तंत्र कमजोर झालं की, या समस्या होतात. अशात आल्याच्या पाण्यानं पचनशक्ती वाढते आणि गॅस-ब्लोटिंगची समस्या दूर होते. अनेकांना पोट साफ न होण्याची देखील समस्या होते, तर आल्याच्या पाण्यानं ही समस्याही दूर होते.
वजन स्पीडनं होतं कमी
मेटाबॉलिज्म बूस्ट झाल्यावर तुम्ही काहीही करून वजन कमी करण्यास करू शकत नाही. डाएट कराल, कितीही एक्सरसाईज कराल किंवा धावाल पण जर मेटाबॉलिज्म बूस्ट होतं नसेल तर वजन कमी होणार नाही. जर तुम्हाला वजन कमी करण्याची प्रक्रिया वेगानं करायची असेल आल्याचं पाणी तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. या पाण्यानं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि फॅट बर्नही वेगानं होतं.
डायबिटीसमध्ये फायदेशीर
डायबिटीस हा एक असा आजार आहे जो आयुष्यभर तुमचा पिच्छा सोडत नाही. कारण या आजार मूळापासून दूर करण्याचा कोणताही ठोस उपाय नाही. जर तुम्हाला डायबिटीस असेल ततर आल्याचं पाणी पिऊन तुम्ही ब्लड शुगर कंट्रोल करू शकता.
कसं तयार कराल आल्याचं पाणी?
अनेक फायदे देणारं आल्याचं पाणी तयार करण्यासाठी १ कप पाण्यात अर्धा चमचा बारीक केलेलं आलं टाका. हे पाणी ५ मिनिटे उकडू द्या. त्यानंतर गाळून घ्या. जेवण केल्यानंतर दिवसातून दोनदा तुम्ही हे पाणी पिऊ शकता. नियमितपणे हे प्यायल्यास तुम्हाला वजनात आणि एकंदर आरोग्यात फरक दिसून येईल.