पोटाचा आणि कमरेचा आकार वाढलाय? घरच्याघरी योगासनं करून मिळवा परफेक्ट फिगर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 12:47 PM2020-01-25T12:47:26+5:302020-01-25T12:49:46+5:30

कामाचा ताण आणि वेळेची कमतरता यांमुळे वजन वाढण्याची समस्या सर्वाधिक जाणवते.

How get perfect figure or loss a weight by doing yogasana | पोटाचा आणि कमरेचा आकार वाढलाय? घरच्याघरी योगासनं करून मिळवा परफेक्ट फिगर

पोटाचा आणि कमरेचा आकार वाढलाय? घरच्याघरी योगासनं करून मिळवा परफेक्ट फिगर

googlenewsNext

कामाचा ताण आणि वेळेची कमतरता यांमुळे वजन वाढण्याची समस्या सर्वाधिक जाणवते.  अनेक महिला कामात व्यस्त असल्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे कंबर आणि पोटावरची चरबी वाढत जाते. यामुळे हवेतसे कपडे घालता येत नाहीत. किंबहूना जे कपडे घालत असतो. त्यात शरीराचा आकार बेढब दिसत असतो. जर तुम्ही सुद्धा वजन वाढण्याच्या समस्येमुळे हैराण झाला असाल किंवा तुम्हाला वजन कमी करण्यासाठी काही करायचं असेल तर जीमला न जाता किंवा कोणतेही जास्त कष्ट न घेता तुम्ही शरीरातील वाढलेली चरबी कमी करू शकता.

Image result for overweight

त्यासाठी तुम्हाला दिवसातून स्वतःसाठी फक्त १५ ते २० मिनिटं द्यावी लागणार आहेत. घरच्या घरी काही योगासनं करून तुम्ही आपली फिगर मेटेंन करू शकता. चला तर मग जाणून घेऊया ही योगासनं केल्याने कशाप्रकारे तुमचं वजन कमी होऊ शकतं. ( हे पण वाचा-व्यायाम आणि डाएटिंग करून सुद्धा वजन कमी होत नाही? तर हे असू शकतं कारण, वेळीच व्हा सावध!)

चक्रासन

Image result for chakrasana

चक्रासन करत असताना तुम्हाला संपूर्ण शरीर हे गोलाकार फिरवावं लागतं. पण कॅलरीज बर्न करण्यासाठी 
फायदेशीर ठरत असतं. हे आसन करण्यासाठी आधी पाठीवर झोपा. त्यानंतर  कंबरेला गोल आकारात हळू हळू   जमीनीच्या दिशेने वाकवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर हातांना मागच्या बाजूला फिरवत जमिनीपर्यंत आणा. पाय तसेच ठेवा. ( हे पण वाचा-जगाची चिंता वाढवणाऱ्या Corona Virus चं मूळ सापडलं, 'या' प्राण्यापासून मनुष्यांना झाली लागण!)

Image result for chakrasana

चक्रासन हे योगासनातील कठीण आसन असले तरी, नियमित सरावात सहज करता येते. याचे फायदेही आयुष्यभर होतात. चक्रासनाद्वारे लवचिकता येते. डोळ्यांचे आजार होत नाही. कंबरेचा त्रास होत नाही. स्नायू बळकट होतात. पोटाची चरबी कमी होते, उंची वाढते, शारीरिक-मानसीक आणि बौद्धिक विकासात भर पडते.  

चतुरंग

Image result for chaturanga asana

वजन कमी करण्यासाठी आणि शरीरात जमा झालेली अतिरीक्त  चरबी कमी करण्यासाठी  चतुरंग आसन फायदेशीर ठरतं असतं. हे आसन करण्यासाठी पुशअप्सच्या पोजिशनमध्ये यावं लागेल. यामुळे तुमच्या शरीराचे मसल्स मजबूत होतील.  दररोज हे आसन ५ ते १० मिनिट करा. त्यामुळे कॅलरिज बर्न होण्यास मदत होईल. त्यामुळे तुमच्या पायांची स्ट्रेन्थ वाढत असते.  ज्या लोकांना हातांवरची अतिरीक्त चरबी कमी करायची असते त्याच्यासाठी हे आसन फायदेशीर ठरेल.

Web Title: How get perfect figure or loss a weight by doing yogasana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.