Corona virus origin links to snakes study finds | जगाची चिंता वाढवणाऱ्या Corona Virus चं मूळ सापडलं, 'या' प्राण्यापासून मनुष्यांना झाली लागण!

जगाची चिंता वाढवणाऱ्या Corona Virus चं मूळ सापडलं, 'या' प्राण्यापासून मनुष्यांना झाली लागण!

कोरोना व्हायरस आपलं डोकं दिवसेंदिवस वर काढत असल्याने जगभरातील लोकांमध्ये चिंता वाढली आहे. त्यात यावर कोणताही उपाय अजून मिळाला नसल्याने अधिक चिंता वाढली आहे. वैज्ञानिक सतत यासंबंधी वेगवेगळी माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. चीनची राजधानी पेइचिंगमधील वैज्ञानिकांनी कोरोना व्हायरसबाबत काही माहिती मिळवली आहे. इथे करण्यात आलेल्या रिसर्चमधून समोर आले आहे की, कोरोना व्हायरस सापांपासून मनुष्यांपर्यंत पोहोचला आहे. कोरोना व्हायरस आणि सापाचं कनेक्शन सांगणारा रिसर्च जर्नल ऑफ मेडिकल वायरॉलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलाय.

गेल्या काही दिवसांपासून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून  कोरोना व्हायरससंबंधी लोकांना सांगण्यात आलं होतं की, हा व्हायरस प्राण्यांशी संबंधित आहे. आणि मांसाच्या बाजारातून, वटवाघूळाच्या माध्यमातून मनुष्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यानंतर या व्हायरसचे जेनेटिकबाबत विश्लेषण करण्यात आलं. 

प्राण्यांसंबंधी वेगवेगळ्या प्रजातीच्या व्हायरससोबत याचं मिश्रण करून याचा अभ्यास करण्यात आला. या रिसर्चमधून समोर आले की, कोरोना व्हायरस एक पेथॉजन आहे. पेथॉजन एकप्रकारचा इन्फेक्शन एजंट आहे. जो आजार देण्याचं काम करतो. याला सामान्य भाषेत जर्म्स असंही म्हणता येईल.

आता या रिसर्चमधून वैज्ञानिकांना याचे पुरावे मिळाले आहेत की, कोरोना व्हायरस मनुष्यांमध्ये येण्याआधी सापांमध्ये होता. म्हणजे हा व्हायरस सापांपासून मनुष्यांमध्ये आला. असेही मानले जात आहे की, हा व्हायरस व्हायरल प्रोटीन सोबत रिकॉम्बिनेशन होऊन तयार झाला. 

आता ही माहिती समोर आल्यानंतर असे मानले जात आहे की, हा व्हायरस सापांपासून पाण्यातील जीव-जंतूंमध्ये गेला. हे जीव-जंतू सीफूड म्हणून वापरले जातात. हा व्हायरस डिसेंबर २०१९ मध्ये चीनच्या वुहान शहरात आढळून आला होता. आता जगभरात पसरत आहे.

काय घ्याल काळजी?

- कोरोना व्हायरस सी फूडच्या माध्यमातून पसरतो. त्यामुळे शक्य असल्यास सध्या सी फूड खाणे टाळावे.

- बाहेर किंवा ऑफिसमध्ये लोकांशी हात मिळवणे टाळावे. कुणाशी हात मिळवले तर हात स्वच्छ धुवावे.

- आजार लोकांच्या संपर्कात येणे टाळा. खासकरून ज्यांना खोकला, ताप किंवा सर्दी-खोकला झालाय.

- घराबाहेर निघताना तोंडाला कापडाने झाकावे. शक्य असेल तर तोंडावर मास्क लावा.

Web Title: Corona virus origin links to snakes study finds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.