(Image Credit : runtastic.com)

वजन कमी करण्यासाठी काही एक्स्ट्रा प्रयत्नांची गरज असते. जर तुम्ही जिम, वर्कआउट आणि डायटिंग हे सगळंच करून थकले असाल आणखी काही सोपे उपाय करून तुम्ही रोज ५०० कॅलरी बर्न करू शकता. आपण जेवढ्या जास्त कॅलरींचं सेवन करतो, त्यातील सर्वच कॅलरींचा वापर शरीर करत नाही. त्यामुळे अतिरिक्त कॅलरी फॅटच्या स्वरूपात जमा होते. त्यामुळे कॅलरी बर्न करणं गरजेचं असतं. काही असे उपाय आहेत ज्यांसाठी तुम्हाला फार मेहनत घेण्याची गरज पडत नाही आणि यांच्या मदतीने तुम्ही वजनही कमी करू शकता. चला जाणून घेऊ कॅलरी बर्न करण्याचे काही सोपे उपाय...

जेवण बारीक चाऊन खावे

जर तुम्हाला रोज जास्तीत जास्त कॅलरी बर्न करायच्या असतील तर हेल्दी आहार घेण्यासोबतच गरज असते अन्न बारीक चाऊन खाण्याची. वेगवेगळे रिसर्च हे सांगतात की, अन्न गिळण्याआधी बारीक चाऊन खाल्लं तर तुम्ही कमी कॅलरीचं सेवन कराल आणि लठ्ठपणाचा धोकाही कमी होईल. त्यामुळे अन्न जास्तीत जास्त बारीक चाऊन खावे. याने तुम्ही ७० कॅलरी कमी करू शकाल. 

दिवसभर बसून राहू नका

(Image Credit : vacancycentre.com)

तज्ज्ञांचं असं मत आहे की, जे लोक दिवसभर बसून राहतात त्यांच्या तुलनेत थोड्या थोड्या वेळाने उठून फिरणारे लोक दिवसभरात ३२० कॅलरी अधिक बर्न करू शकतात. त्यामुळे ऑफिसच्या वेळेत अधून-मधून वेळ काढून थोडा वेळ फेरफटका मारून यावे.

जेवण हळूहळू करा

(Image Credit : healthxchange.sg)

जर जेवण करताना तुम्ही स्पीड कमी ठेवला तर तुम्ही ३०० कॅलरी अधिक बर्न घटवू शकता. एका रिसर्चनुसार, हळूहळू खाल्ल्याने तुम्ही प्रत्येक जेवणावेळी ३०० पर्यंत कॅलरीचं सेव करता, ज्यामुळे दिवसभरात तुम्ही ५०० किंवा त्यापेक्षा अधिक कमी कॅलरीचं सेवन करता.

नाश्त्याआधी वर्कआउट आणि सायंकाळी ७ नंतर काही खाऊ नका

(Image Credit : joe.co.uk)

हे कॉम्बिनेशन फॉलो करून तुम्ही ५०० पेक्षा अधिक कॅलरी वाचवू शकता. एका रिसर्चनुसार, जेव्हा तुम्ही नाश्त्याआधी वर्कआउट करता तेव्हा तुम्ही सांयकाळच्या वर्कआउटच्या तुलनेत २८० कॅलरी अधिक बर्न करू शकता. सोबतच एका रिसर्चनुसार, रात्री स्नॅक्स न खाऊन लोक दररोज २४० कमी कॅलरींच सेवन करतात.

पुरेशी झोप घ्या

(Image Credit : earth.com)

एका रिसर्चनुसार, कमी झोप घेतल्याने तुम्ही लठ्ठपणाचे शिकार होऊ शकता. कारण जर तुम्ही रात्री उशीरापर्यंत जागे राहत असाल तर तुम्ही रात्री उशीरापर्यंत स्नॅक्स खात रहाल. त्यामुळे हे टाळण्यासाठी चांगली आणि पुरेशी झोप घ्यावी. जर तुम्ही ७ ते ८ तास झोप घेतली तर ५०० पेक्षा अधिक कॅलरी घटवू शकता.

टीव्हीसमोर खाऊ नका

(Image Credit : davidwolfe.com)

जर तुम्ही टीव्हीसमोर बसून काही खात असाल तर तुम्ही २५० पेक्षा अधिक कॅलरींचं सेवन करता. त्यामुळे चुकूनही टीव्हीसमोर बसून खाऊ नका. 


Web Title: How to cut 500 calories per day to lose weight
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.