शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

साबण, मीठासह 'या' उपायांनी मास्क स्वच्छ कराल; तरच संक्रमणापासून लांब राहाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 12:50 IST

CoronaVirus News: मास्कच्या वापराबाबात काही गोष्टी सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही कोरोनाच्या संक्रमणापासून लांब राहू शकता. 

कोरोना व्हायरसचं संक्रमण संपूर्ण जगभरात पसरलेलं असून भारतातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात मृत्यूदर कमी असला तरी या माहामारीने लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.  कोरोनाचा सामना करण्यासाठी मास्क, सोशल डिस्टेंसिंगचा वापर सर्वत्र होताना दिसून येत आहे. अनेक रिसर्चमध्ये दिसून आले आहे की, मास्क वापरत असतानाही कोरोनाच संक्रमण होऊ शकतं. आज आम्ही तुम्हाला मास्कच्या वापराबाबात काही गोष्टी सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही कोरोनाच्या संक्रमणापासून लांब राहू शकता. 

मास्क गरम पाण्यात आणि उन्हात  धुवून सुकवा

मास्क शक्यतो वॉशेबल असल्यास उत्तम ठरेल. बाहेरून घरी आल्यानंतर मास्क काढून साबण आणि पाण्याने धुवा. उन्हात मास्क सुकू द्या. नंतरच पुन्हा वापरा. जेणेकरून संक्रमणाचा धोका उद्भवणार नाही. पावसाळ्यात वातावरणात ओलावा असतो. त्यामुळे कपडे सुकण्यासाठी वेळ लागतो. अशा स्थितीत  प्रेशर कुकरमध्ये पाणी घाला. त्यात मीठ घाला.  यात १५ मिनिटांपर्यंत मास्क घालून ठेवा. त्यानंतर मास्क पाण्यातून बाहेर काढून पिळून सुकवायला ठेवा. 

सुकवण्यासाठी इस्त्रीचा वापर करा

मास्क साबणाने धुतल्यानंतर सुकवण्यासाठी तुम्ही इस्त्रीचाही वापर करू शकता. केंद्र सरकारने सोशल  मीडियावर दिलेल्या एका व्हिडीओत मास्कच्या वापराबाबत  गाईडलाईन्स देण्यात आल्या आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी फक्त वॉशेबल मास्कसाठी या पद्धतीचा वापर करा. डिस्पोजेबल मास्क एकदा वापरून फेकून द्या.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्वच्छतेच्या उत्पादनांच्या विशेषतः मास्क आणि हात धुवायच्या सॅनिटायझर्सच्या खरेदीकडे वळल्यामुळे अचानक मागणी वाढून टंचाई निर्माण झाली. त्यामुळे तुम्ही घरच्याघरी मास्क तयार करून लावू शकता. दरम्यान WHO ने दिलेल्या माहितीनुसार अनेकदा जास्तवेळपर्यंत मास्क लावणं घातक ठरू शकते. कारण कार्बन डायऑक्साईडचा स्तर वाढल्यास श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. 

त्यासाठी एन 95 मास्क आरोग्य विभागातील कर्मचारी वर्गासाठी आवश्यक आहे. पण तुम्ही या मास्कचा वापर करत असाल तर दीर्घकाळ वापरू नका. धावत असताना किंवा वेगाने चालताना एन95 मास्क काढून टाका. मास्कशिवाय घराबाहेर पडू नका. मास्क गरजेपेक्षा जास्त घट्ट बांधू नका. 

घरी तयार केलेले मास्त जास्त फायदेशीर ठरतील कारण त्यामुळे श्वास घेण्यासाठी त्रास होत नाही. कारण त्यासाठी सुती कापडाचा वापर केला जातो. जर मास्क घातल्यानंतर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर सुरक्षित ठिकाणी आराम करा. डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

Coronavirus : वैज्ञानिकांनी सांगितले 'ही' आहेत कोरोनाची दोन मु्ख्य लक्षणे, दिसताच लगेच डॉक्टरांना करा संपर्क!

CoronaVirus: रेल्वे स्टॉलवर आता मास्क, सॅनिटायझर, उशा, बेडरोल आणि टॉवेलही मिळणार 

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स