ऑफिसमध्ये ज्या व्यक्तींचा डेस्क जॉब असतो. त्यांना तासन्तास कुर्चीवर बसून काम करावं लागतं. अशा लोकांना वजन कमी करणं म्हणजे, आव्हानच. वजन कमी करण्यासाठी डाएट प्लान आणि एक्सरसाइजसोबत अॅक्टिव्ह लाइफही आवश्यक असते. जर तुम्ही दररोज एक्सरसाइज आणि डाएट प्लान फॉलो करत असाल आणि तरिदेखील वजन कमी होत नसेल तर ऑफिसमध्ये बसल्या बसल्याच काही उपाय करणं आवश्यक आसतं. सतत बसून काम करणाऱ्या व्यक्ती अनेकदा लठ्ठपणाच्या शिकार होतात. आज आम्ही काही असे उपाय सांगणार आहोत, जे ऑफिसमध्ये कुर्चीवर तासन्तास बसून काम करणाऱ्या लोकांना वजन कमी करण्यासाठी मदत करतात. 

नाश्त्यावर लक्ष द्या 

ज्या व्यक्ती ऑफिसमध्ये जॉब करतात त्यांना आपल्या फिटनेससाठी सर्वात आधी डाएटवर लक्ष देणं गरजेचं आहे. जर तुम्ही ब्रेकफास्टमध्ये हेल्दी पदार्थ घेत नसाल तर लठ्ठपणाचे शिकार होऊ शकता. 

याव्यतिरिक्त जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला हेल्दी नाश्त्यासोबतच वेळही पाळणं गरजेचं आहे. जर तुम्ही दररोज नाश्त्याचा टाइम बदलत अशाल तर वजन कमी करणं तुमच्यासाठी अवघड होऊ शकतं. 

(Image Credit : Dthree Studio)

प्रत्येक तासाला ब्रेक घेणं गरजेचं

जर तुम्ही 8 ते 9 तासांचा जॉब करत असाल तर तुम्हाला काही तासांचा ब्रेक घेणं गरजेचं असतं. सतत खुर्चीवर तान्सतास बसत असाल तर असं करणं टाळा. अनेक संशोधनातून असं सांगितलं जातं की, एक व्यक्ती जर सतत एकाच जागी 45 ते 1 तासासाठी बसत असली तर ते आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. त्यामुळे तुम्हाला थोड्या थोड्या वेळाने काही वेळासाठी उठणं गरजेचं असतं. यामुळे आरोग्य चांगलं राखण्यासोबतच वजन कमी करण्यासाठीही मदत होते. 

वजन कमी करण्यासाठी पाणी असतं आवश्यक 

जर तुम्ही सतत एकाच जागी बसून काम करत असाल आणि लठ्ठपणाने त्रस्त असाल तर वजम कमी करणं तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. वजन कमी करण्यासाठी पाणी पिणं गरजेचं असतं. त्यामुळे वेगाने वजन कमी होण्यास मदत होते. जर तुम्ही किती पाणी प्यावं या प्रश्नाने हैराण असाल तर 75 मिनिटांनी एक ग्लास पाणी पिऊ शकता. 


 

बॉडी पोश्चर 

वाढत्या वजनासाठी बॉडी पोश्चरही कारण ठरतं. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने बसून ऑफिसमध्ये काम करत अशाल तर लठ्ठपणाचे शिकार होऊ शकता. खुर्चीवर बसत असाल तर नेहमी सरळ बसा आणि मध्ये-मध्ये उठून काही वेळासाठी चाला. बॉडी पोश्चर ठिक करण्यासाठी आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी एक्सरसाइजही करू शकता. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही कोणताही दाव करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.)


Web Title: How can i stay in shape with a desk job
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.