सध्याच्या काळात वजन वाढण्यची समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवत असते. ऑफिसमध्ये किंवा घरी अनेक तास बसून काम केल्यामुळे शरीराचा आकार बेढब होत जातो. ही समस्या महिलांमध्येच नाही तर पुरूषांमध्ये जाणवते. वजन कमी करण्यासाठी कितीही जरी डाएट केलं तरी फरक दिसून येत नाही.  प्रत्येकवेळी जीमला जाण्यासाठी वेळ असतोच असं नाही. कारण घरातल्या आणि बाहेरच्या कामापासून वेळ मिळत नसतो. जर ही परिस्थिती टाळायची असेल आणि वजन कमी करायचं असेल तर तुम्ही घरच्याघरी व्यायाम करून आपलं वजन कमी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया कोणता व्यायाम केल्याने  तुमच्या शरीरावरची चरबी दूर होईल.

Image result for hula hooping

हुला हूपिंग या सोपा व्यायाम प्रकार करून तुम्ही कमरेवरची आणि पोटावरची वाढलेली  चरबी कमी करू शकता.  हुला हूपिंगमुळे तुमच्या शरीराचा चांगला व्यायाम होईल आणि वजन कमी होण्यास  मदत होईल. फक्त गंमत म्हणून नाही तर हुला हूपिंगमुळे तुम्ही खरंच आकर्षक शरीर मिळवू शकता.  चला तर मग जाणून घ्या कशी करायची हुला हूपिंग.

Image result for hula hooping

जर तुम्हाला पोटावरची चरबी करण्यासाठी तर दररोज १५ ते २० मिनिट  हुला हूपिंग केल्यास फायदेशीर ठरेल. या व्यायाम प्रकारामुळे तुमच्या शरीरावरची चरबी  कमी करण्यासाठी  मदत होईल. तसंच पोटाचे मसल्स  बळकट करण्यासाठी  हा व्यायाम प्रकार फायदेशीर ठरतं असतो. त्यामुळे तुमच्या कमरेला सुद्धा सुडौल आकार येत असतो. या व्यायाम प्रकारात तुमच्या कमरेचा भाग गोलाकार तसंच पुढे मागे फिरवावा लागतो.  यामुळे तुमचं शरीर लवचीक राहतं.

Image result for hula hooping
हुला हूपिंहगचे फायदे

या व्यायाम प्रकारामुळे शरीरातील ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित राहते.  

शारीरिक हालचाली  केल्यामुळे  रक्तप्रवाह सुरळीत राहतो.  

स्पाईन आणि पाठीचे मणके मजबूत राहतात. 

पाठ आणि पोटाशिवाय संपूर्ण शरीररासाठी हा फायदेशीर व्यायाम आहे. 

 कॅलरीज बर्न होत असतात. अतिरीक्त चरबी घटण्यास मदत होते.

Web Title: how can do weight loss by using hula hooping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.