शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
3
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
4
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
5
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
6
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
7
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
8
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
9
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
10
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
11
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
12
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
13
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
15
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
16
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
17
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
18
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
19
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
20
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

घरात वर्कआउट करणं जिममध्ये एक्सरसाइज करण्याइतकच फायदेशीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 10:51 AM

अलिकडे जिमला जाण्याचा ट्रेन्ड फारच वाढलेला बघायला मिळतो. अनेकजण जिमची फी तर भरतात पण जिमला जाण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. तुम्ही अशाच लोकांपैकी एक असाल तर फार चिंता करण्याची गरज नाही.

(Image Credit : health.usnews.com)

अलिकडे जिमला जाण्याचा ट्रेन्ड फारच वाढलेला बघायला मिळतो. अनेकजण जिमची फी तर भरतात पण जिमला जाण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. तुम्ही अशाच लोकांपैकी एक असाल तर फार चिंता करण्याची गरज नाही. अभ्यासकांनुसार, घरीच वर्कआउट करणेही जिममध्ये एक्सरसाइज करण्याइतकंच फायदेशीर ठरतं. इतकेच नाही तर घरात वर्कआउट केल्याने केवळ तुमचे पैसेच वाचतात असं नाही तर वेळही वाचतो.

होम बेस्ड एक्सरसाइजचा काय होतो प्रभाव?

द जर्नल ऑफ फिजिऑलॉजी नावाच्या मॅगझिनमध्ये या रिसर्चचे निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले आहेत. या रिसर्चमध्ये घरीच हाय इंटेंसिटी इंटरवल ट्रेनिंग म्हणजेच  HIIT प्रोग्रामची टेस्ट केली गेली आणि खासकरून हेही बघण्यात आलं की, याप्रकारच्या होम बेस्ड प्रोग्रामचा लठ्ठपणाने शिकार असलेल्या व्यक्ती, ज्यांना हृदयरोगांचा अधिक धोका असतो, त्यांच्यावर काय प्रभाव पडतो.

(Image Credit : Metro)

लठ्ठपणाचे शिकार असलेल्या ३२ लोकांची १२ आठवडे एक्सरसाइज 

लिव्हरपूल जॉन मूर्स युनिव्हर्सिटी आणि या रिसर्चचे लेखक सॅम स्कॉट म्हणाले की, होम बेस्ट HIIT प्रोग्रामशी संबंधित एक्सरसाइजमुळे केवळ वेळच नाही तर पैशांची देखील बचत होते. तसेच एक्सरसाइजमध्ये फार सक्रिय नसलेल्यांचा इंटरेस्ट देखील वाढतो. याने लोकांच्या आरोग्यावर चांगला परिणामही होतो. 

(Image Credit : www.self.com)

या रिसर्चसाठी लठ्ठपणाचे शिकार असलेल्या ३२ लोकांना १२ आठवडे एक्सरसाइजचा प्रोग्राम करण्यास सांगण्यात आले. या लोकांच्या आरोग्यासंबंधी इतरही टेस्टही करण्यात आल्याय ज्यात बॉडी कॉम्पोझिशन, हृदयरोगाचा धोका आणि शरीरात ग्लूकोज रेग्युलेट करण्याची क्षमता यांचा समावेश होता.

३ वेगवेगळ्या ग्रुपमध्ये विभागून निष्कर्ष बघण्यात आले

(Image Credit : www.self.com)

या ३२ लोकांना ३ वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये विभागण्यात आलं. पहिल्या ग्रुपमध्ये ते होते ज्यांनी लॅब बेस्ड सायक्लिंग HIIT प्रोग्राम केला, दुसऱ्यात ते होते ज्यांनी यूके सरकारकडून तयार करण्यात आलेला १५० मिनिटांचा मॉडरेट इंटेंसिटी एक्सरसाइज प्रोग्राम करण्यात आला आणि तिसऱ्यात ते होते ज्यांनी होम बेस्ड  HIIT प्रोग्रामशी संबंधित सोप्या बॉडी वेट एक्सरसाइज केल्यात. यात त्यांनी कोणत्याही साहित्यांचा वापर केला नाही. अभ्यासकांना आढळलं की, होम बेस्ड  HIIT प्रोग्राम सुद्धा तेवढाच लठ्ठपणाने हैराण असलेल्या व्यक्तींच्या फिटनेससाठी प्रभावी आहे, जेवढ्या इतर दोन एक्सरसाइज आहेत.

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स