घामाची दुर्गंधी दूर करण्याचे बेस्ट उपाय, लोक तुमच्यापासून पळणार नाहीत दूर!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 03:43 PM2024-04-05T15:43:34+5:302024-04-05T15:44:00+5:30

Under arm sting : घामाच्या दुर्गंधीची समस्या दूर करण्यासाठी आम्ही काही घरगुती उपाय तुम्हाला सांगणार आहोत.

Home remedies to reduce sweat smell | घामाची दुर्गंधी दूर करण्याचे बेस्ट उपाय, लोक तुमच्यापासून पळणार नाहीत दूर!

घामाची दुर्गंधी दूर करण्याचे बेस्ट उपाय, लोक तुमच्यापासून पळणार नाहीत दूर!

Under arm sting : उन्हाळा सुरू झाला की, घामामुळे लोक हैराण होतात. सोबतच घामाच्या दुर्गंधीमुळे त्यांना आणि इतरांनाही त्रास होते. अशात चार चौघात जाण्यासही भिती वाटते. त्यामुळे घामाच्या दुर्गंधीची समस्या दूर करण्यासाठी आम्ही काही घरगुती उपाय तुम्हाला सांगणार आहोत.

गुलाबजल

आंघोळीच्या पाण्यात काही थेंब गुलाबजल टाका. गुलाबजल एक नॅचरल कुलर आहे. यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल. तसेच तुम्ही घामाची दुर्गंधी दूर करण्यासाठी अंडरआर्ममध्ये बटाटाच्या स्लाइसने रब करा. यानेही दुर्गंधी जाते.

तुरटी-पदीना

तसेच आंघोळीच्या पाण्यात थोडी तुरटी फिरवा किंवा पदीन्याची पाने बारीक करून टाका. यानेही घामाची दुर्गंधी दूर होण्यास मदत मिळते.

बेकिंग सोडा

बेकिंग सोड्याचा तुम्ही टॅल्कम पावडरच्या रूपात वापर करू शकता. बेकिंग सोडा एक पाण्यात मिक्स करा आणि हे पाणी, काखेत, पायांच्या बोटांच्या मधे लावा. यासाठी एक कप पाण्यात 2 चमचे बेकिंग सोडा टाका. कपडे घालण्याआधी हे मिश्रण घाम येणाऱ्या भागांवर लावा.

​ग्रीन टी

पाणी उकडून घ्या आणि त्यात ग्रीन टी ची काही पाने टाका. हे पाणी थंड झालं तर कॉटनच्या मदतीने ते घाम येणाऱ्या भागात लावा. चहा त्वचा शुष्क आणि गंधमुक्त ठेवण्यास मदत करते. याचा वापर तुम्ही आठवड्यातून दोनदा करा.

टोमॅटोच्या पाण्याने आंघोळ

1 कप ताजा टोमॅटोचा रस घ्या आणि तो एक बकेट पाण्यात टाका. या पाण्याने आंघोळ करा. टोमॅटोमधील अ‍ॅंटीसेप्टीक गुण कोणत्याही प्रकारचा गंध निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाला नष्ट करण्यास मदत करतो.

लिंबू आणि कॉर्नस्टार्च

लिंबू त्वचेची पीएच लेव्हर संतुलित करण्यास मदत करतं. 2 मोठे चमचे कॉर्नस्टार्च आणि लिंबाचा रस घेऊन पेस्ट तयार करा. ही पेस्ट काखेत लावा आणि 10 मिनिटांनी ती स्वच्छ करा.

घामाच्या दुर्गंधीची कारणे

मसालेदार पदार्थ

फार जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्यानेही शरीराची दुर्गंधी येऊ लागते. त्यामुळे उन्हाळ्यात जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळावेत.

तणाव

तणाव असल्यावर शरीरातून घाम अधिक निघतो. यादरम्यान शरीरात कॉर्टिसोल हार्मोन अधिक रिलीज होतात. ज्यामुळे असं होतं. जास्त प्रमाणात निघालेला घाम जेव्हा बॅक्टेरियाच्या संपर्कात येतो तेव्हा दुर्गंधी येऊ लागते. 

औषधांचं सेवन

जर तुम्ही फार जास्त औषधे घेत असाल तर याचा प्रभाव तुमच्या शरीरावरही होतो. औषधांमधील रासायनिक तत्व शरीराच्या गंधाला प्रभावित करतात. अशात घाम आणि शरीराचा गंध मिळून दुर्गंधी निर्माण होते. 

Web Title: Home remedies to reduce sweat smell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.