शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

पित्ताची समस्या दूर करण्यासाठी सोपे घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 18:51 IST

Acid reflux cure : अ‍ॅसिड रिफ्लक्सची सर्वात मोठी ओळख ही व्यक्तीला अस्वस्थ वाटणे आणि छातीत जळजळ होणे असते. कधी कधी छातीच्या खालीही वेदना होता. यावर काही घरगुती उपायांनीही उपचार केला जाऊ शकतात.

Acid reflux cure : जेव्हा आपली पचनक्रिया खराब होते तेव्हा अनेकांना अ‍ॅसिड रिफ्लक्स ही समस्या होते. जेव्हा पोटातून अ‍ॅसिड अन्ननलिकेकडे येऊ लागतं. तेव्हा याला अ‍ॅसिडीक रिफ्लक्स म्हटले जाते. याला सर्वसामान्य भाषेत आम्लपित्त म्हटले जाते. अपुरी झोप, तणावग्रस्त जीवनशैली, अरबट-चरबट फास्ट फूड खाणे अशा अनेक कारणांनी शरीरात पित्ताचे दोष निर्माण होतात. तीव्र डोकेदुखी, छातीत जळजळ, उलट्या होणे, अस्वस्थ वाटणे अशी पित्ताची लक्षणे दिसून येतात.

अ‍ॅसिड रिफ्लक्सची सर्वात मोठी ओळख ही व्यक्तीला अस्वस्थ वाटणे आणि छातीत जळजळ होणे असते. कधी कधी छातीच्या खालीही वेदना होता. यावर काही घरगुती उपायांनीही उपचार केला जाऊ शकतात.

१) केळी 

केळीतून शरीराला उच्च प्रतीच्या पोटॅशियमचा पुरवठा होतो त्यामुळे पोटात आम्ल निर्मितीची प्रक्रिया मंदावते. तसेच ‘फायबर’ शरीराची पचनक्रिया सुलभ करते. फळांमधील काही विशिष्ट घटकांमुळे अम्लांच्या विघातक परिणामांपासून आपले रक्षण होते. पित्त झाल्यास पिकलेले केळ खाल्याने आराम मिळतो. केळ्यातील पोटॅशियम विषहारक द्रव्य म्हणून काम करते व पित्ताचा त्रास कमी होतो.

2) तुळस 

तुळशीमधील एन्टी अल्सर घटक पोटातील / जठरातील अम्लातून तयार होणाऱ्या विषारी घटकांपासून बचाव करते. तुम्हाला पित्ताचा त्रास जाणवत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असेल तर ४-५ तुळशीची पाने चावून खा.

3) दूध

दुधातील कॅल्शियमच्या घटकांमुळे पोटात तयार होणारी आम्ल निर्मिती थांबते व अतिरीक्त आम्ल दूध खेचून त्याचे अस्तित्व संपवते. थंड दूध प्याल्याने पित्तामुळे होणारी पोटातील व छातीतील जळजळ कमी होते. दुध हे पित्तशामक असून ते थंड तसेच त्यात साखर वा इतर पदार्थ न मिसळता प्यावे. मात्र त्यात चमचा भर साजूक तूप घातल्यास ते हितावह होते.

4) बडीशेप

बडीशेपमधील एन्टी अल्सर घटक पचन सुधारते व बद्धकोष्ठता दूर करते. बडीशेपमुळे पोटात थंडावा तयार होऊन जळजळ कमी होते. बडीशेपाचे काही दाणे केवळ चघळल्याने देखील पित्ताची लक्षणे कमी होण्यास  मदत होते. तसेच पित्तामुळे अस्वस्थ वाटत असल्यास , बडीशेपाचे दाणे पाण्यात उकळून ते रात्रभर थंड करून ठेवलेले पाणी प्यायल्याने आराम मिळतो.

5) लवंग

लवंग चवीला तिखट असली तरीही  लवंग अतिरिक्त लाळ खेचून घेते , पचन सुधारते आणि पित्ताची लक्षणं दूर करते. लवंगामुळे पोटफुगी व गॅसचे विकार दूर होतात. जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर लवंग दाताखाली पकडून ठेवा, त्यातून येणारा रस काहीकाळ तोंडात राहू द्या. यारसामुळेच पित्ताची तीव्रता कमी होते. लवंगेमुळे घश्यातील खवखवही कमी होते.

6) वेलची

आयुर्वेदानुसार वेलची शरीरातील वात, कफ व पित्त यांमध्ये समतोल राखण्याचे काम करते. स्वादाला सुगंधी व औषधी गुणांनी परिपूर्ण वेलचीच्या सेवनाने पचन सुधारते. पित्ताचा त्रास कमी होतो. पित्तापासून आराम मिळवण्यासाठी वेलचीचे दोन दाणे ठेचून ती पाण्यात टाकून उकळा, हे पाणी थंड झाल्यावर प्यायल्याने पित्तापासून तात्काळ आराम मिळेल.

7) पुदिना

पुदिना पोटातील आम्लाची तीव्रता कमी करत. पुदिन्यातील वायूहारक गुणधर्मामुळे पचनक्रिया सुधारते. पुदिन्यातील थंडाव्यामुळे पोटदुखी व जळजळ थांबते. पित्ताचा त्रास होत असल्यास काही पुदिन्याची पाने कापा व पाण्यासोबत उकळून घ्या. थंड झाल्यावर हे पाणी प्यावे. ‘मेन्थॉल’ पचण्यास जड पदार्थ खाल्ल्याने होणारा त्रास, डोकेदुखी तसेच सर्दी दूर करण्यास मदत करतो.

8) आलं

आलं या औषधी मुळाचा भारतीय स्वयंपाकघरात प्रामुख्याने वापर केला जातो. आल्याच्या सेवनाने पचन सुधारते. तसेच पोटातील अल्सरशी सामना करण्यास आल्याचा फायदा होतो. आल्यातील तिखट व पाचकरसांमुळे आम्लपित्त कमी होते. पित्तापासून आराम मिळवण्यासाठी आल्याचा एक लहान तुकडा चघळत रहा. तुम्हाला जर आलं तिखट लागत असेल तर ते पाण्यात टाकून उकळून ते पाणी प्यावे.

9) आवळा

तुरट, आंबट चवीचा आवाळा  कफ आणि पित्तनाशक असून त्यातील ‘व्हिटामिन सी’, अन्ननलिका व पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते.रोज चमचाभर आवळ्याची पावडर / चूर्ण घेतल्यास पित्ताचा त्रास होत नाही .कच्चा आवळा मिठासोबत खाल्ल्यास शरीरास सर्व रस मिळतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य