थंडीमध्ये हातापायांच्या वेदनांवर गुणकारी ठरतात 'हे' उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 19:41 IST2018-11-19T19:37:35+5:302018-11-19T19:41:35+5:30
थंडीमध्ये स्किनच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर थंड वातावरणामुळे अनेक लोकांच्या हातापायांच्या बोटांना सूज येते. बोटांना सूज आल्यामुळे वेदना होतात आणि त्यामळे शरीरावरील त्वचा जाण्यास सुरुवात होते.

थंडीमध्ये हातापायांच्या वेदनांवर गुणकारी ठरतात 'हे' उपाय!
थंडीमध्ये स्किनच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर थंड वातावरणामुळे अनेक लोकांच्या हातापायांच्या बोटांना सूज येते. बोटांना सूज आल्यामुळे वेदना होतात आणि त्यामळे शरीरावरील त्वचा जाण्यास सुरुवात होते. सुजलेल्या बोटांनी कोणतंही काम करताना त्रास होतो. त्यामुळे या समस्येपासून सुटका करण्यासाठी लोक औषधांचा आधार घेतात. परंतु काही घरगुती उपायांनीही या समस्येपासून सुटका करणं सहज शक्य आहे.
...म्हणून हिवाळ्यात हातापायांच्या बोटांना सूज येते
प्रत्यक्ष थंडीच्या संपर्कात आल्यामुळे शरीराच्या काही नसा गोठल्या जातात. याचा थेट परिणाम शरीरातील रक्त प्रवाहावर होतो. ज्यामुळे हाता-पायाच्या बोटांना सूज येते. अनेकदा सूज येण्यासोबतच बोटांची जळजळ होते.
थंडीमध्ये हाताच्या बोटांची सूज दूर करण्यासाठी उपाय :
1. मोहरीमध्ये असतात औषधी गुण
4 चमचे मोहरीचे तेल आणि 1 चमचा सैंधव मीठ एकत्र गरम करून घ्या. झोपण्यापूर्वी हातापायांच्या बोटांवर लावून मसाज करा आणि मोजे घालून झोपा. यामुळे बोटांवरील सूज दूर होण्यास मदत होते. मसाज करण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑइलचाही वापर करू शकता.
2. कांदा ठरतो फायदेशीर
अॅन्टी-बायोटिक आणि अॅन्टी-सेप्टिक गुण असल्यामुळे कांदा बोटांवरील सूज दूर करण्यासाठी उपयोगी ठरतो. कांद्याचा रस सूज आलेल्या जागेवर लावून काही वेळ तसाच ठेवा. त्यामुळे आराम मिळतो.
3. लिंबाचा रस गुणकारी
लिंबाचा रस सूज कमी करण्यासाठी मदत करतो. हाताच्या आणि पायांच्या बोटांवर लिंबाच्या रसाने मसाज करा. आराम मिळेल.
4. बटाट्याचा रस सूज दूर करतो
बटाटा कापून त्यामध्ये मीठ एकत्र करा आणि सुजलेल्या बोटांवर लावा. काही वेळातच सूज कमी होऊन आराम मिळेल.
5. हळद ठरते औषधी
ऑलिव्ह ऑइलमध्ये 1/2 चमचा हळद मिक्स करून वेदना होत असलेल्या जागांवर लावा. त्यामुळे त्वचेच्या समस्या, वेदना आणि सूज कमी होते.