उच्च तापमानात कोरोना विषाणू कमी सक्रिय असतो का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 16:00 IST2022-01-14T15:57:40+5:302022-01-14T16:00:02+5:30
उच्च तापमान आणि कोरडं हवामान कोरोना व्हायरससह विविध व्हायरसची संसर्गजन्यता कमी करू शकतं. तर त्याउलट कमी तापमान आणि आर्द्रतेमध्ये व्हायरसचं आयुष्य वाढत असल्याचा दावा तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे.

उच्च तापमानात कोरोना विषाणू कमी सक्रिय असतो का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
गेल्या 2 वर्षांपासून आपण कोरोनाच्या महामारीशी लढतोय. आणि तेव्हापासूनच कोरोनासंदर्भात विविध तज्ज्ञ संशोधन करत आहेत. दरम्यान अशातच तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, उच्च तापमान आणि कोरडं हवामान कोरोना व्हायरससह विविध व्हायरसची संसर्गजन्यता कमी करू शकतं. तर त्याउलट कमी तापमान आणि आर्द्रतेमध्ये व्हायरसचं आयुष्य वाढत असल्याचा दावा तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे. 'MedRxiv' मध्ये प्रकाशित ब्रिस्टल युनिवर्सिटीच्या एरोसोल रिसर्च सेंटरच्या संशोधनानुसार, कोरोना व्हायरस हवेशी केवळ २० मिनिटं संपर्कात आल्यास त्याची संसर्गजन्य क्षमता ९० टक्क्यांनी कमी होते.
संशोधनात म्हटल्याप्रमाणे, 'हवेच्या २० मिनिटांच्या संपर्कात आल्यानंतर, SARS-CoV-2 ची संसर्गजन्य क्षमता १० टक्क्यांपर्यंत कमी होते.' दरम्यान या संशोधनाचं सध्या उच्च स्तरावर माहिती घेतली गेलेली नाही. प्रसिद्ध विषाणूतज्ज्ञ डॉ. जेकब जॉन यांनी सांगितलं की, "सर्व विषाणू अधिक कोरड्या वातावरणात मरून जातात. तर विपरीत वातावरणात (adverse environment) त्यांचं आयुष्य खूपच कमी असतं. याशिवाय कमी तापमान आणि आर्द्रता त्यांचे आयुष्य वाढवतं."
physician epidemiologist and public policy specialist डॉ चंद्रकांत लहरिया म्हणाले की, हा अभ्यास अतिशय उपयुक्त असल्याचं सिद्ध होतंय. व्हायरसचा प्रसार कमी करण्यासाठी विकसित याचा वापर केला जाऊ शकतो. विशेषतः बंद ठिकाणं जसं की मॉल्स, शाळा आणि ऑफिस याठिकाणी याचा वापर होऊ शकतो.