हिटरमुळे डोळ्यांचे आरोग्य येते धोक्यात; निर्माण होऊ शकते 'ही' गंभीर समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 06:19 PM2022-01-25T18:19:07+5:302022-01-25T18:31:46+5:30

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हिटर आणि ब्लोअरमधून गरम हवेच्या थेट संपर्कात आल्याने त्वचा आणि डोळ्यांना नुकसान होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये, हा वारा तुमच्या डोळ्यांसाठी गंभीर समस्या देखील निर्माण करू शकतो.

heater increases the chances of dry eye syndrome | हिटरमुळे डोळ्यांचे आरोग्य येते धोक्यात; निर्माण होऊ शकते 'ही' गंभीर समस्या

हिटरमुळे डोळ्यांचे आरोग्य येते धोक्यात; निर्माण होऊ शकते 'ही' गंभीर समस्या

Next

या थंडीच्या मोसमात आपण शरीराला उबदार ठेवण्यासाठी विविध उपाय करत असतो. हीटर आणि ब्लोअर सारखी उपकरणे यामध्ये खूप उपयुक्त मानली जातात, पण तुम्हाला माहित आहे का की शरीराला कृत्रिम उष्णता देणाऱ्या या उपकरणांच्या अतिवापरामुळे तुमच्यासाठी गंभीर समस्या उद्भवू शकतात?(Eye Care Tips) आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हिटर आणि ब्लोअरमधून गरम हवेच्या थेट संपर्कात आल्याने त्वचा आणि डोळ्यांना नुकसान होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये, हा वारा तुमच्या डोळ्यांसाठी गंभीर समस्या देखील निर्माण करू शकतो.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हीटरसारख्या उपकरणांमधून बाहेर पडणारी हवा तुमच्या सभोवतालच्या हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी करते. यामुळे हवा कोरडी होते, ज्यामुळे त्वचेला कोरडेपणा, खाज सुटणे यासारख्या समस्या निर्माण होतात.

याशिवाय, हिटर किंवा ब्लोअरच्या अतिवापरामुळे तुमच्या डोळ्यांनाही इजा होऊ शकते, त्यातून बाहेर पडणाऱ्या हवेचा डोळ्यांच्या ओलाव्यावरही परिणाम होतो, त्यामुळे लोकांचे डोळे कोरडे पडणे आणि त्याच्याशी संबंधित इतर समस्या उद्भवू शकतात. हेच कारण आहे की अशा उपकरणांचा वापर कमीत कमी करण्याचा सल्ला दिला जातो. याविषयी सविस्तर जाणून घ्या.

कोरड्या डोळ्यांची समस्या वाढत आहे :- ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ कमल बी कपूर अमर उजाला या संकेतस्थळाला दिलेल्या माहितीत म्हणतात, "हिवाळ्याच्या मोसमात डोळे कोरडे होण्याचे प्रमाण अधिक असते, याचे एक कारण उपकरणांमधून बाहेर पडणाऱ्या गरम हवेच्या थेट संपर्कात येणे हे आहे. डोळे कोरडे होतात जेव्हा डोळ्यांत पुरेसे अश्रू येत नाहीत. या स्थितीत डोळ्यांमध्ये लालसरपणा, खाज सुटणे किंवा जळजळ होण्याची समस्या असू शकते.

डोळ्यांना गंभीर नुकसान :- डॉ कमल सांगतात, ज्या लोकांमध्ये डोळ्यांना कोरडे पडण्याची समस्या आहे, काही वेळा हीटर्सच्या वापरामुळे लक्षणे अधिक तीव्र होतात. विशेषत: कारच्या हीटरमधून बाहेर पडणाऱ्या हवेमुळे वातावरण कोरडे होते, ज्यामुळे अशा लोकांच्या समस्या वाढू शकतात. या उपकरणांमधून बाहेर पडणारी गरम हवा डोळ्यांच्या थेट संपर्कात येऊ नये याची नेहमी काळजी घेतली पाहिजे. ते अधिक हानिकारक असू शकते.

या गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्ही संरक्षण करू शकता :- आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, थंडीपासून बचाव करण्यासाठी गरम हवेची उपकरणे वापरणे ही आपली गरज बनली आहे, मात्र त्यांचा वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर त्यामुळे होणार्‍या समस्या बर्‍याच अंशी टाळता येऊ शकतात. शरीरात गरम हवेच्या प्रवाहाचा थेट संपर्क टाळा. गरम हवा थेट तुमच्या डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या.

थंड किंवा उष्ण वाऱ्यापासून डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी गॉगल घाला, ते अश्रूंचे बाष्पीभवन होण्यापासून रोखण्यास मदत करतात. शरीराला हायड्रेट ठेवा. भरपूर पाणी पिणे केवळ उन्हाळ्यातच आवश्यक नाही, तर हिवाळ्यातही ते आवश्यक आहे. द्रवपदार्थ सेवन केल्याने तुमच्या डोळ्यांसह शरीराच्या सर्व भागांना हायड्रेट ठेवण्यात मदत होईल.

कोरडे डोळे कसे बरे करावे? :- डोळ्यांना कोरडे पडण्याची समस्या जाणवत असेल तर उशीर न करता चांगल्या नेत्रतज्ज्ञांशी संपर्क साधा. सामान्य परिस्थितीत, ही समस्या काही डोळ्यांच्या थेंबांच्या मदतीने दूर केली जाऊ शकते. तुमचे डॉक्टर तुम्हाला काही व्यायाम सुचवू शकतात जे तुमच्या डोळ्यांचा कोरडेपणा वाढण्यापासून रोखू शकतात. डोळ्यांच्या कोरडेपणाच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका या खास गोष्टीची काळजी घ्या, अन्यथा मोठी समस्या उद्भवू शकते.

Web Title: heater increases the chances of dry eye syndrome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.