Healthy Food Tips in Marathi : foods you should avoid with tea | तुम्हीसुद्धा चहासोबत हे पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा; कधी आजारी पडाल कळणारही नाही

तुम्हीसुद्धा चहासोबत हे पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा; कधी आजारी पडाल कळणारही नाही

खाण्यापिण्यातून अनेक पोषक तत्व मिळत असतात. ज्यांची आपल्याला रोजच्या आहारात आवश्यकता असते. काही खाद्य पदार्थांमध्ये गैर पोषक तत्व असतात.  त्यामुळे विटामिन्स आणि मिनरल्सना एब्जॉर्ब करण्यास अडथळा येऊ शकतो. व्हिटामीन्स आणि मिनरल्स योग्य प्रमाणात एब्जॉर्ब करण्यासाठी आपल्या आहारात बदल करणं गरजेचं आहे. आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार ज्याचे सेवन चहासोबत केल्यानं शरीराला नुकसान पोहोचू शकतं. जेणेकरून तुम्ही तुमच्या चुकीच्या सवयी बदलून आरोग्यावर लक्ष देऊ शकता.

लोह आणि प्रोटीन्सयुक्त पदार्थ चहासोबत खाऊ नका

चहामध्ये सापडलेल्या टॅनिन त्यास गडद तपकिरी रंग देतात. त्याचप्रमाणे ग्रीन टीमध्ये कॅटेचिन आणि फ्लेव्होनॉइड असतात, जे समान प्रकारचे टॅनिनच असतात, जे प्रथिने आणि लोह  शोषण्यापासून रोखू शकतात. टॅनिनच्या अस्तित्वामुळे, लोह आणि प्रथिने समृध्द असलेले पदार्थ चहा बरोबर खाऊ नयेत, जे शेंगदाण्यांमध्येही आढळतात. सालं काढून टाकल्यामुळे अन्नात टॅनिनची पातळी कमी होऊ शकते.

हिरव्या भाज्यांमुळे आयोडीनची कमतरता निर्माण होऊ शकते

हिरव्या पालेभाज्यांमधे असलेले गोयट्रोजन खरंच थायरॉईड ग्रंथीद्वारे आयोडिन घेण्यास अडथळा आणतो आणि आयोडीनची कमतरता वाढवू शकतो. कोबी, फुलकोबी, हिरव्या भाज्या, मुळा, मोहरी, ब्रोकोली आणि सोयाबीनमध्ये गोयट्रोजन असतात. परंतु स्वयंपाक करताना या भाज्यांना उकळवून किंवा ब्लीचींगमुळे गोयट्रोजनची पातळी कमी केली जाऊ शकते.

तज्ज्ञ काय सांगतात?

हैदराबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या तज्ज्ञ दमयंती यांच्या मते, गडद हिरव्या पालेभाज्यांमधील ऑक्सॅलेट्स, फायटिक एसिड्स,  फायबर-युक्त पदार्थांमधील (संपूर्ण धान्य आणि भाज्या) लोह कॅफिन पेय  शोषण्यास प्रतिबंधित करतात.  काही रिसर्चनुसार दुधातील प्रोटीन्समुळेही शरीरातील  लोहावर  परिणाम होत असतो.  भारतीय पुरूषांमध्ये वाढतेय इन्फर्टीलिटीची समस्या; 'या' सवयीवर वेळीच नियंत्रण ठेवावं लागणार

कॅल्शियम ऑब्जर्वेशनमध्ये बाधा 

हरभरा डाळीत ऑक्सलेट असतात. जे कॅल्शियम शोषण रोखण्यासाठी ओळखले जाते. हे कॅल्शियम आणि कॅल्शियम ऑक्झलेटसह एकत्रित   स्टोन बनवते. उकळण्या सारख्या स्वयंपाक करण्याच्या काही पद्धतीचे जेवण खाण्याने ऑक्सलेटचे प्रमाण कमी  होऊ शकते. स्वयंपाकात काही बदलांव्यतिरिक्त, कॅल्शियम समृद्ध आहार घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि व्हिटॅमिन-सी समृद्ध असलेले अन्नपदार्थ चहासोबत खाणं टाळावे. काही व्हिटामीन्स आणि मिनरल्स  एकमेकांसह  रिएक्शन करतात. कॅल्शियम लोह एब्जॉर्ब करण्यात बाधा निर्माण करतात. त्यामुळे डेअरी प्रॉडक्ट्ससह लोह  सप्लिमेंटचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो.Coronavirus: काेराेनामुक्त नागरिकांना सतावतेय वजन वाढण्याची समस्या; सरकारी रुग्णालयात तक्रार नाही

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Healthy Food Tips in Marathi : foods you should avoid with tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.