Coronavirus: काेराेनामुक्त नागरिकांना सतावतेय वजन वाढण्याची समस्या; सरकारी रुग्णालयात तक्रार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 12:48 AM2021-01-26T00:48:28+5:302021-01-26T00:48:46+5:30

काेराेना कालावधीत कमी झालेले वजन आता वाढत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. 

Coronavirus No complaint to government hospital | Coronavirus: काेराेनामुक्त नागरिकांना सतावतेय वजन वाढण्याची समस्या; सरकारी रुग्णालयात तक्रार नाही

Coronavirus: काेराेनामुक्त नागरिकांना सतावतेय वजन वाढण्याची समस्या; सरकारी रुग्णालयात तक्रार नाही

Next

रायगड : काेराेनावर मात केलेल्यांना आता विविध समस्यांना सामाेरे जावे लागत आहे. केस गळणे, दम लागणे, थकवा जाणवणे अशी लक्षणे दिसत असतानाचा आता वजन वाढण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते आहे. मात्र वजन वाढल्याची तक्रार अद्यापही जिल्हा सरकारी रुग्णालयात काेराेनावर मात केलेल्या रुग्णांनी केली नसल्याचा दावा आराेग्य यंत्रणेने केला आहे.

मार्च महिन्यापासून काेराेनाने जिल्ह्यात शिरकाव केला. त्यानंतर या घातक विषाणूने चांगलेच थैमान घातले. काेराेनामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये दहशत निर्माण झाली हाेती. सरकार प्रशासन विविध उपाययाेजना करत हाेते. दीड हजाराहून अधिक काेराेना रुग्णांचा बळी गेला. 

काेराेनावर लसच उपलब्ध नसल्याने रेमडेसिवीर, त्याचप्रमाणे अन्य राेगप्रतिकारशक्ती वाढवणारी औषधे रुग्णांना देण्यात आली आहेत. त्यामुळे या आणि अन्य औषधांमध्ये स्टेराॅइडचे प्रमाण असल्याने विविध दुष्परिणाम आता समाेर येत आहेत.स्टेराॅइडमुळे वजन वाढत असल्याचे समाेर येत आहे. काेराेना कालावधीत कमी झालेले वजन आता वाढत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. 

कोरोनामुक्त रुग्णांचे अनुभव
काेराेनाच्या कालावधीत प्रकृती चांगलीच खालावली हाेती. सुरुवातीला ८० किलाे वजन हाेते. काेराेना झाल्यामुळे वजन तब्बल 
२० किलाेने कमी झाले हाेते. काेराेनावर मात केल्यानंतर सुरुवातीला खूपच थकवा जाणवत हाेता. ताेंडाला चव नसल्याने काही खाण्याची-पिण्याची इच्छा नव्हती. बरे झाल्यानंतर वजन ९० किलाेपर्यंत गेले. त्यामुळे मी आता ते पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या ८४ किलाे वजन झाले आहे.

काेराेनातून बरे झाल्यानंतर केस गळण्यास सुरुवात झाली. अधूनमधून दम लागत असल्याने जास्त श्रम करता येत नाहीत. कधी तरी डाेळे चुरचुरतात. आता वजन वाढत आहे. भूक लागत नसल्याने काेराेनाकाळात वजन कमी झाले हाेते. मात्र आता वजन चांगलेच वाढले आहे, ते नियमित करण्यासाठी व्यायाम करण्यात येत आहे.

स्टेराॅइडमुळे वजन वाढू शकते
काेराेनावर आता लस उपलब्ध झाली आहे. सुरुवातीला रेमडेसिवीर तसेच राेगप्रतिकारशक्ती वाढवणारी औषधे काेराेना रुग्णांना देण्यात आली. स्टेराॅइडमुळे रुग्णांचे वजन वाढू शकते. काेराेनामुळे रुग्णांचे वजन २० किलाेने कमी झाल्याचे आढळले हाेते. काहींना केस गळण्याचा तर काहींना दम लागणे, थकवा जाणवणे अशा समस्या जाणवत आहेत. ताेंडाला चव नसल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या आहेत. काेराेनावर मात केलेल्यांनी आरामाबराेबरच नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. याचबरोबर योग्य पोषण आहार घेणे आवश्यक आहे.

काेराेनावर सुरुवातीला लस उपलब्ध नव्हती. त्यामुळे रेमडेसिवीर, तसेच अन्य राेगप्रतिकारके रुग्णांना देण्यात आली. स्टेराॅइडमुळे वजन वाढण्याची शक्यता आहे. काेराेनावर मात केलेल्यांनी याबाबत तक्रार केलेली नाही. अचानक वजन वाढले असल्यास सकस आहार, आराम आणि नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. समस्या असल्यास नजीकच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा. - डाॅ. राजीव तांबाळे, वैद्यकीय अधिकारी

Web Title: Coronavirus No complaint to government hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.