शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

दिवाळीत अरबटचरबट खाल्ल्यावर 'ही' डिटॉक्स ड्रिंक्स प्या, वजन अगदी झटपट कमी होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 14:39 IST

विषारी घटकांमुळे होणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी शरीरातील विषारी घटक काढून टाकणे अत्यंत आवश्यक आहे. दिवाळी २०२१ च्या मुहूर्तावर अशा डिटॉक्सिफिकेशन ड्रिंक्सबद्दल जाणून घ्या जे शरीरातील विषारी पदार्थ काही वेळात बाहेर काढतील.

चयापचय वाढवण्यासाठी वेळोवेळी शरीराला डिटॉक्स करणे फार महत्वाचे आहे. सणासुदीमध्ये तर ते अधिक महत्त्वाचे बनते. कारण या दरम्यान अनेक तळलेले पदार्थ एकाच वेळी आपण खातो. या चक्रात शरीरात विषद्रव्ये तयार होतात. विषारी घटकांमुळे होणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी शरीरातील विषारी घटक काढून टाकणे अत्यंत आवश्यक आहे. दिवाळी २०२१ च्या मुहूर्तावर अशा डिटॉक्सिफिकेशन ड्रिंक्सबद्दल जाणून घ्या जे शरीरातील विषारी पदार्थ काही वेळात बाहेर काढतील.

हळदीचे दूधसणासुदीच्या काळात शरीराला डिटॉक्स करण्यासाठी हळदीचे दूध एक उत्तम उपाय आहे. ते तयार करण्यासाठी, उकळत्या दुधात दालचिनीचा तुकडा, थोडी काळी मिरी, लवंग आणि वेलची आणि एक चमचा हळद घाला. ते ५ मिनिटे उकळवा. यानंतर त्यात मध घालून प्या. हे दूध रोज प्यायल्याने खूप फायदा होतो.

लिंबू-आले पेयलिंबू आणि आले देखील शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात. यासाठी एक ग्लास पाण्यात अर्धा लिंबू पिळून त्यात एक इंच आल्याचा तुकडा टाका. ते चांगले उकळून अर्धे गाळून प्या. तुम्ही ते सकाळी आणि रात्री जेवणानंतर पिऊ शकता.

बीट पेयशरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी बीटरूट ड्रिंक देखील खूप चांगले मानले जाते. ते बनवण्यासाठी अर्धा ग्लास पाण्यात बीटरूटचे तुकडे करून उकळा. त्यात मीठ, मिरपूड आणि लिंबू घालून गरमागरम प्या.

दालचिनी पेयएक चतुर्थांश चमचे दालचिनी पावडर एका ग्लास पाण्यात उकळा. त्यात अर्धा लिंबू आणि एक चमचा मध मिसळून ते गाळून चहासारखे प्या. हे पेय तुमचे चयापचय सुधारण्याबरोबरच तुमचे शरीर डिटॉक्स करेल.

ग्रीन टीदिवसातून दोन ते तीन वेळा ग्रीन टी प्या. ग्रीन टी हा देखील चांगला पर्याय आहे. लिंबू आणि मध मिसळून ग्रीन टी प्यायल्यास आणखी चांगले परिणाम मिळतील. जर तुम्ही हिरव्या चहाची पाने वापरत असाल तर पाणी उकळल्यानंतर त्यात एक चमचा पाने टाका आणि 5 मिनिटे झाकून ठेवा. यानंतर लिंबू आणि मध टाकून गाळून प्या.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स