दिवाळीत अरबटचरबट खाल्ल्यावर 'ही' डिटॉक्स ड्रिंक्स प्या, वजन अगदी झटपट कमी होईल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 14:39 IST2021-11-05T14:17:26+5:302021-11-05T14:39:11+5:30
विषारी घटकांमुळे होणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी शरीरातील विषारी घटक काढून टाकणे अत्यंत आवश्यक आहे. दिवाळी २०२१ च्या मुहूर्तावर अशा डिटॉक्सिफिकेशन ड्रिंक्सबद्दल जाणून घ्या जे शरीरातील विषारी पदार्थ काही वेळात बाहेर काढतील.

दिवाळीत अरबटचरबट खाल्ल्यावर 'ही' डिटॉक्स ड्रिंक्स प्या, वजन अगदी झटपट कमी होईल
चयापचय वाढवण्यासाठी वेळोवेळी शरीराला डिटॉक्स करणे फार महत्वाचे आहे. सणासुदीमध्ये तर ते अधिक महत्त्वाचे बनते. कारण या दरम्यान अनेक तळलेले पदार्थ एकाच वेळी आपण खातो. या चक्रात शरीरात विषद्रव्ये तयार होतात. विषारी घटकांमुळे होणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी शरीरातील विषारी घटक काढून टाकणे अत्यंत आवश्यक आहे. दिवाळी २०२१ च्या मुहूर्तावर अशा डिटॉक्सिफिकेशन ड्रिंक्सबद्दल जाणून घ्या जे शरीरातील विषारी पदार्थ काही वेळात बाहेर काढतील.
सणासुदीच्या काळात शरीराला डिटॉक्स करण्यासाठी हळदीचे दूध एक उत्तम उपाय आहे. ते तयार करण्यासाठी, उकळत्या दुधात दालचिनीचा तुकडा, थोडी काळी मिरी, लवंग आणि वेलची आणि एक चमचा हळद घाला. ते ५ मिनिटे उकळवा. यानंतर त्यात मध घालून प्या. हे दूध रोज प्यायल्याने खूप फायदा होतो.
लिंबू आणि आले देखील शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात. यासाठी एक ग्लास पाण्यात अर्धा लिंबू पिळून त्यात एक इंच आल्याचा तुकडा टाका. ते चांगले उकळून अर्धे गाळून प्या. तुम्ही ते सकाळी आणि रात्री जेवणानंतर पिऊ शकता.
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी बीटरूट ड्रिंक देखील खूप चांगले मानले जाते. ते बनवण्यासाठी अर्धा ग्लास पाण्यात बीटरूटचे तुकडे करून उकळा. त्यात मीठ, मिरपूड आणि लिंबू घालून गरमागरम प्या.
एक चतुर्थांश चमचे दालचिनी पावडर एका ग्लास पाण्यात उकळा. त्यात अर्धा लिंबू आणि एक चमचा मध मिसळून ते गाळून चहासारखे प्या. हे पेय तुमचे चयापचय सुधारण्याबरोबरच तुमचे शरीर डिटॉक्स करेल.
दिवसातून दोन ते तीन वेळा ग्रीन टी प्या. ग्रीन टी हा देखील चांगला पर्याय आहे. लिंबू आणि मध मिसळून ग्रीन टी प्यायल्यास आणखी चांगले परिणाम मिळतील. जर तुम्ही हिरव्या चहाची पाने वापरत असाल तर पाणी उकळल्यानंतर त्यात एक चमचा पाने टाका आणि 5 मिनिटे झाकून ठेवा. यानंतर लिंबू आणि मध टाकून गाळून प्या.