Health Tips Marathi : Benefits of eating raw onions | कच्चा कांदा खाण्याचे 'हे' फायदे वाचाल; तर जेवताना रोजच आवडीनं कांदा  खाल

कच्चा कांदा खाण्याचे 'हे' फायदे वाचाल; तर जेवताना रोजच आवडीनं कांदा  खाल

कांद्याशिवाय जेवणाला चव येत नाही. काही लोकांना तर जेवणासोबत कच्चा कांदा लागतोच. सॅलॅडमध्ये कांदा नसेॅ तर त्याला चव येत नाही. कांद्याचा वापर फक्त भाजीची चव वाढविण्यासाठी किवा मसाला आणि सॅलाडमध्येच नाही तर आजारांपासूनही बचाव करण्यासाठीही केला जातो. आज आम्ही तुम्हाला रोज कच्चा कांदा खाल्ल्यानं शरीराला कोणते फायदे मिळतात याबाबत सांगणार आहोत.

गंभीर आजारांपासून बचाव होतो

कांदा नियमितपणे खाल्याने हृदयाचे आजार होत नाही. लाल कांदा खाल्याने प्रोटस्ट आणि पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता कमी असते. त्याचप्रमाणे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकून हृदयाचे आरोग्य वाढविण्यात लाल कांदा फायदेशीर ठरतो. याला नियमितपणे खाल्याने हाय ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. 

पोट साफ होण्यास मदत होते

कच्च्या कांद्या मध्ये फाइबर जास्त प्रमाणात. जे पोटात चिटकलेले अन्न बाहेर काढते. कच्चा कांदा खाण्यामुळे पोटाची सफाई होते. यामुळे बद्धकोष्ठता असणाऱ्या लोकांनी कच्चा कांदा आवश्य खावा.

रक्त शुद्ध करण्यासाठी

कांद्या मध्ये फास्फोरिक एसिड असते त्यामुळे रक्तीतील टॉक्सिन्स बाहेर निघून जाण्यास मदत होते. कांद्याची पेस्ट तयार करून त्याचा लेप आपल्या पायाच्या तळव्यांना लावून झोपून जावे यामुळे फास्फोरिक एसिड आपल्या धमनी मध्ये प्रवेश करून अशुध्दता दूर करेल.

सर्दीचा त्रास कमी करण्यासाठी 

कांद्याच्या रसा मध्ये एक चमचा मध मिक्स करून दिवसातून 2-3 वेळा चाटल्याने सर्दी दूर होते.कांदा लाल असो किंवा पांढरा तो आरोग्यासाठी फायदेशीरच असतो. फक्त लाल कांद्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारी पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात. तुम्ही कांदा खाणं टाळत असाल तर कांदा खाणं लगेच सुरू करा. 

रोगप्रतिकारकशक्ती वाढते

कच्चा कांदा एंटीबॅक्टेरियाप्रमाणे काम करतो त्यामुळे शरीरातील बॅक्टेरियांची वाढ रोखण्यास मदत होते. व्हायरसचं संक्रमणामुळे निर्माण होत असलेल्या सर्दी, खोकला  या समस्या दूर होण्यास मदत होते. कच्च्या कांद्याचे सेवन केल्यानं शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. 

रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं

 रोजच्या जेवणात कांद्याचा समावेश केल्यास रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं. याशिवाय कॅन्सरच्या सेल्सची वाढ होण्यापासून रोकता येऊ शकतं. शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित राहून तोंडावरिल पुळ्या, डाग कमी होण्यासाठी कांदा फायदेशीर ठरतो. पित्ताची समस्या कमी होण्यासाठीही कांदा गुणकारी ठरतो. 

हे पण वाचा-

शहरांसह ग्रामीण भागातही वेगानं पसरतोय कोविड 19; सिरो सर्व्हेचा दुसरा टप्पा असू शकतो भीषण

अरे व्वा! इम्युनिटी वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतोय मास्कचा वापर; शास्त्रज्ञांचा दावा

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Health Tips Marathi : Benefits of eating raw onions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.